शिवैक्य साधण्यासाठी अतर्मनाची शुध्दी असली पाहिजे
पंचाचार,अष्टावरण व षटस्थल ही विरशैवांची सुत्रे आहेत--शि.भ.प.शिवलिंग स्वामी मानखेडक गुरुजी
उदगीर:पंचाचार,अष्टावरण व षटस्थल ही विरशैवांची सुत्रे असुन शिवैक्य साधण्यासाठी अतर्मनाच्या शुध्दी साठी पंचाचार चे आचरण करावे असे विचार शि.भ.प. शिवलिंग स्वामी मानखेडकर यांनी व्यक्त केले.
उदगीरचे आराध्य दैवत सदगूरु श्री हावगीस्वामी महाराज मंदिरचा जिर्णोध्दार व मंदिराचा सुवर्ण कलशारोहण सोहळा निमित्य श्री गुरु हावगी स्वामी मठाचे मठाधिश शिवाचार्यरत्न ष.ब्र.108 डाॅ.शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली श्री गुरु हावगी स्वामी महाराज मठ संस्थानचे बिदर गेट येथील भव्य जागेत शिवनाम सप्ताह, परमरहस्य ग्रंथाचे पारायण प्रसंगी प्रवचनात शि.भ.प. शिवलिंग स्वामी मानखेडकर गुरुजी यांनी धर्मातील पंचाचार या विषयावर सखोल असे विचार मांडले प्रत्येक जिवाला जेथून आलो तेथेच जायचे आहे पावसाचे पाणी सागरातून येते व सागरालाच मिळते .
विरशैव धर्म आचरणात आणण्यासाठी प्रामुख्याने पाच सुत्रे सांगीतली आहेत
विरशैव धर्माचा पायाच मुळात पंचाचार,अष्टावरण, आणी षटस्थल हाच आहे. मुख्यत्वे करुन शिवऐक्य साधण्यासाठी आणी अंतर्मनाच्या शुध्दी साठी पंचाचाराचा विचार आचरणात आणणे महत्वाचे आहे.पंचाचार म्हणजे सदाचार,शिवाचार,लिंगाचार,गणाचार
भृताचार आहे.सदाचार म्हणजे व्यवहारात प्रामाणिकपणा,श्रमाला प्रतिष्ठा,असत्य भाषा वर्ज्य,परधन वर्ज्य ,परस्री मातेसमान,नित्य परोपकार,भोग लालसे पासुन दुर,गूंरुचा आदर करणे,स्री पुरुष भेदभाव न मानने याचा समावेश आहे .शिवाचार म्हणजे प्रत्येक जिवात शिव पाहणे असे सांगून मानखेडकर महाराज म्हणाले की,
संसार देवाचा आहे समजून संसार केला रतर जिवन आनंदी होईल. सेवेचे वर्णन करताना नोकर -पगार ठरवतो व काम करतो ,सेवक - काम करतोव दिलेले स्विकारतो,दास- मालकान दिल तरी घेत नाही ,दास काहीच मागत नाही फक्त सेवेतच आनंद मानतो. प्रजा आहे म्हणून राजा आहे लहान मोठा कुणी नाही सेवा भावनेने काम करा सेवेची मजूरी घेऊ नका भ्रष्टाचाराने दृष्टी बदलते अंगात सेवा भाव ठेवावा, सेवक म्हणून काम करा असे सांगून शिवाचार ,लिंगाचार, यावर बहुमोल विचार व्यक्त करुन अष्टावरण,षटस्थल विषयी सविस्तर विवेचन केले.
या प्रसंगी शि.भ.प. चंद्रशेखर काळवणे यांनी विचार व्यक्त केले.
0 Comments