Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

श्री गुरु हावगी स्वामी मंदिर सुवर्ण कलशारोहण सोहळानिमित्य 5051 शिवभक्तांचा भव्य परमरहस्य पारायण सोहळ्यास प्रारंभ

श्री गुरु हावगी स्वामी मंदिर सुवर्ण कलशारोहण सोहळा
निमित्य 5051 शिवभक्तांचा भव्य परमरहस्य पारायण सोहळ्यास  प्रारंभ

उदगीर (प्रतिनिधी) गुरु हावगी स्वामी मंदिर सुवर्ण कलशारोहण सोहळा निमित्य 5हजार51शिवभक्तांचा भव्य ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळा  सोमवार दि.13 मे   रोजी शानदार  प्रारंभ 
झाला.
उदगीरचे आराध्य दैवत सदगूरु श्री हावगीस्वामी महाराज मंदिरचा जिर्णोध्दार व मंदिराचा सुवर्ण कलशारोहणनिमित्य श्री गुरु हावगी स्वामी मठाचे मठाधिश शिवाचार्यरत्न ष.ब्र.108 डाॅ.शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांचे नेतृत्वाखाली श्री गुरु हावगी स्वामी महाराज मठ संस्थानचे बिदर गेट येथील भव्य जागेत  सोमवार दि.13 मे रोजी अखंड शिवनाम सप्ताह,परमरहस्य ग्रंथ पारायणचा शुभारंभ सकाळी 9 वाजता पंचाचार्य ध्वजारोहण,पंचकश पुजन व विणा पुजन म.नि.प्र.अल्लमप्रभू चौकी मठउदगीर,ष.ब्र.विरुपाक्षेश्वर शिवाचार्य महाराज मुखूडकर,म.नि.प्र.सिध्दलिंग महास्वामी देवणी,आचार्य श्री गुरुराज महाराज भक्ती स्थळ अहमदपूर यांचे शुभ हस्ते  व  विरभद्र स्वामी सताळकर यांच्या नेत्रत्वाखालील पौरहित्य मंडळाच्यि मंत्रोच्चारात पुजन होऊन परमरहस्य ग्रंथ पारायणास प्रारंभ झाला.
या वेळी उपस्थित शिवाचार्य यांचे श्री गुरु हावगी स्वामी मठ संस्थानचे मठाधिश ष.ब्र.डाॅ.शंभूलिंग शिवाचार्य महाराजव मंदिर समितीचे शिवराज नावंदे ,सुभाष धनूरे यांनी स्वागत केले.
परमरहस्य ग्रंथ पारायण व्यासपीठ प्रमुख  म.नि.प्र.संगनबस्व महास्वामी निलंगा,शि.भ.प. उध्दव महाराज हैबतपुरे,लक्ष्मीबाई पांढरे,विश्वनाथ गंथडे,सौ.अनिता हैबतपुरे,गंगाधर माळेवाडीकर,दिलिप स्वामी,मच्छिंद्र कोरे,अशोक बिरादार माळेवाडीकर तर शिवपाठ प्रमुख शि.भ.प.शिवलिंग पाटिल कदुकिनीकर,शि.भ.प.गंगाधर जळकोटे,,किर्तनकार प्रमुख शि.भ.प.तानाजी पाटिल ,शि.भ.प. बालाजी पाटिल,बस्वराज बाळे तर गियक वादक प्रसिध्द गितकिर सुरमणी सोमनाथ  (रविराज) किडीले,हावगी पन्नासे कवठेकर,भिमाशंकर भुरे शिराढोण,सौ.लरुबाई सुतार,नारायण नाटकरे, बाबुराव धुळशेट्टे,बस्वराज शिवपुजे हे आहेत.  
आशिर्वचन कार्यक्रमासआचार्य गुरुराज महाराज- म्हणाले की,संकल्प पुर्तीच्या आरंभाचा  होत असुन  शंभूलिंग शिवाचिर्य महाराजाच्या 
पट्टाभिषेकाच्या दिवशी केलेला संकल्प आज पूर्ण होत आहे.

मठाचा वैभव वाढवणे भक्ताना जागृत करणे गूरुचे काम

हजोरो वर्षाची परंपरा पुढे नेण्याचे कार्य 
उदगीर वाशियाचे वैभवाला परम वैभवात रुपांतर करा
ष.ब्र.शंकरलिंग शिवाचार्य महाराज-परमरहस्य ग्रंथाची ओळख राष्ट्र संत डाॅ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी करुन दिली.15 व्या शतकात मन्मथ माउलीनी परमरहस्य ग्रंथ लिहिला व  21 व्या शतकात  राष्ट्र संत डाॅ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी उजाळा दिला.जीवनाचे सार परमरहस्य ग्रंथात आहे संकल्प पुर्ती करण्याचे सामर्थ परमरहस्य ग्रंथात आहे.
शिवभक्तांचे कल्याण करण्याचे सामर्थ सांगून परमरहस्य ग्रंथाचे महात्म सांगीतले.माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे  म्हणाले की, परमरहस्य ग्रंथाच्या पारायणामुळे उदगीर व परिसरातील  मानव जातीचा कल्याण होणार आहे. शंभूलिंग शिवाचार्य महाराजांमुळे  भक्ताच्या कल्याणासाठी मठाच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत.श्री.श्री.सिध्दऔंकार शिवाचार्य महाराज जगमवाडी आपल्या आशिर्वचनात म्हणाले की,कलयुगात नामाला महत्व आहे.किती विद्वान आहे या पेक्षा त्याचे आचार विचार महत्वाचेहे महत्वाचे असुन नामस्मरणाने जिवन धन्य होणारआहे.
असे सांगून परमरहस्य ग्रंथ पारायाणाचे महत्व सांगीतले.
समारोप  शंभूलिंग शिवाचार्य महाराजयांचू आशिर्वचनाने झाला.   विजय निटुरे व अजय निटुरे यांच्या हस्ते सपत्निक आरती होऊन पहिल्या दिवसाच्या पहिल्या दिवसाच्या प्रथम सत्राचा समारोप झाला.
कै.प्रसाद निटुरे यांच्या स्मृती माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे परिवाराच्यावतीने महा प्रसादाची व्यवस्था करण्यात आली .

Post a Comment

0 Comments

जाहिरात