वाढवणा येथील २० वर्षीय तरुणी उदगीर बसस्थानकातून बेपत्ता..
उदगीर : प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील वाढवणा (खु) येथील एक २० वर्षीय तरुणी उदगीर बसस्थानकावरुन बेपत्ता झाली आहे. अशी तक्रार मुलीच्या वडिलांनी दिल्यावरुन उदगीर शहर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आठच्या सुमारास मिसिंग दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.११ मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास उदगीर बसस्थानकावरुन खबर देणार यांनी अर्ज दिला की त्यांची २० वर्षाची मुलगी ही बसस्थानक उदगीर येथुन कोणालाही काही एक न सांगता निघून गेली आहे.
याप्रकरणी रेणुकाबाइ देविदास शिंदे रा. वाढवणा (खु) ता. उदगीर यांच्या तक्रारीवरुन उदगीर शहर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल पुठेवाड हे करीत आहेत.
0 Comments