उदगीर - नागलगाव रोडवर देवदर्शन करुन परतणाऱ्या ऑटोला अपघात; एका महिलेचा मृत्यू...
उदगीर - नागलगाव रस्त्यावर देवदर्शनावरुन परतणाऱ्या ऑटोला ट्रॅक्टरने विरुद्ध दिशेने जोराची धडक दिली. झालेल्या या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी रविवारी (१२ मे) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.क्षभाग्यश्री जयानंद केवडे (वय २१ रा. नागलगाव ता. उदगीर) असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि.५ मे रोजी रात्री साडे आठच्या सुमारास उदगीर - नागलगाव रस्त्यावर फियादी ची मूलगी व तिचे सासरचे लोक ऑटो क्र. एम.एच.२४ ई ८७९० या ऑटोने देवदर्शन करून गावाकडे परत जात असताना समोरून येणारे ट्रॅक्टर एम.एच.२४ एल.५६३७ च्या चालकाने त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर हयगय व निष्काळजीपणाने भरघाव वेगात चालवून फिर्यादीची मूलगी बसून येत असलेल्या ऑटोला चूकीच्या दिशेने येवून समोरून जोराची धडक देवून ऑटोतील लोकांना गंभीर जखमी करून फिर्यादीच्या मूलीच्या मरणास कारणीभूत ठरला.
याप्रकरणी जयानंद भिमराव केवडे (रा. नागलगाव ता. उदगीर) यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल धुळशेट्टे हे करीत आहेत.
0 Comments