आर्य कन्या वैदिक संस्कार शिबिरास प्रारंभ
उदगीर:आर्य समाज उदगीर व आर्य विर दल उदगीरच्या वतीने मुलींच्या सर्वांगिण विकासासाठी आर्य कन्या वैदिक संस्कार शिबिराचे उदघाटन ईंदिराबाई चॅरिटेबल ट्रष्टचे अध्यक्ष दिलिप गायकवाड यांच्या हस्ते संपन्न.
महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा अंतर्गत आर्यसमाज उदगीर व्दारा कॅप्टन डाॅ.भारती जाधव यांच्या स्मृत्यर्थ आयोजित मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालय उदगीरच्या निसर्गरम्य वातावरणात निवासी आर्य कन्या वैदिक संस्कार शिबिर 12 ते 19 मे 2024 दरम्यान हे शिबिर संपन्न होत आहे .या शिबिराचे उदघाटन ईंदिराबाई चॅरिटेबल ट्रस्ट उदगीर चे अध्यक्ष दिलिप गायकवाड यांच्या हस्ते झाले .या शिबिरासाठी आर्थिक योगदान जाहिर केले.
या शिबिरात प्रशिक्षण देण्यासाठी हस्तिनापुर उत्तरप्रदेश येथील नितेश आर्य व अभिषेक आर्य दिल्ली हे योगा, संचलन, लाठी,काठी,तलवार, रायफल, कराटे,घोडेस्वारीचे प्रशिक्षण, मुलींना स्वरक्षणासाठी हल्ला परतवून लावणारे शिक्षण देणार आहेत,
मुलींना आरोग्यविषय मार्गदर्शन , वेदांचा परिचय, गिता मार्गदर्शन, पर्यावरण मार्गदर्शन, राष्ट्रिय एकात्मता, सामाजिक व पारिवारिक कर्तव्याचे मार्गदर्शन या शिबारात तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत.
या आर्य वैदिक कन्या शिबिरात महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील 12 ते 20 वयोगटातील एकुण 151 मुलींनी सहभाग घेतला आहे. शिबिर यशस्वी करण्यासाठी आर्य समाज मंत्री डाॅ. नरेंद्र शिंदे, संस्कार शिबिर प्रमुख अर्जुनराव सोमवंशी, महाराष्ट्र आर्य विर दल अधिष्ठाता व्यंकटेश हालिंगे, आर्यविर दल उदगीरचे अधिष्ठाता सुबोध अंबेसंगे, उपअधिष्ठाता बलराज कंधारे,बाबुराव नवटक्के,सतिष मगदाळे, भाऊराव अहमदाबादे, सौ.मधूमती शिंदे,सौ.कुमुद अंबेसंगे, सौ.अनिता कंधारे, सौ.संध्या बेद्रे,सौ.पुजा मगदाळे,सौ.सुमती भातांब्रे आदी परिश्रम घेत आहेत.
0 Comments