Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

जळकोट रोडवर पिकअप टेम्पोने दोघा दुचाकी स्वारांना उडविले, एक ठार तर एक जण जखमी

जळकोट रोडवर पिकअप टेम्पोने दोघा दुचाकी स्वारांना उडविले, एक ठार तर एक जण जखमी 

उदगीर शहरातील जळकोट रोडवर गतिरोधक बसवा अन्यथा आंदोलन करू,माजी नगरसेवक फयाज शेख

उदगीर शहरातील जळकोट रोडवर १० मे रोज शुक्रवारी रात्री ९:३० वाजता पिकअप टेम्पोने दोन दुचाकी स्वाराना उडविले या अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे,सूत्रांनी दिलेली माहिती अशी की जळकोट रोडवर आडे बिल्डिंगच्या समोर पिकअप टेम्पो क्रमांक एम.एच.४७ ई १४७३ च्या चालकाने दुचाकी क्रमांक एम.एच.१२ एच.के ३९४४ व दुचाकी क्रमांक एम.एच.१२ डी.एक्स १७७९ या दोन दुचाकी स्वाराला जोराची धडक दिली.यात एम.एच.१२ एच.के ३९४४ क्रमांच्या दुचाकीवरील युवक ओमकार रमेश मोरे वय २१ वर्ष राहणार म्हाडा जळकोट रोड उदगीर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,अपघात इतका भीषण होता की पिकअप टेम्पो चालकाने दुचाकीला १०० मीटर रस्त्याच्या कडेला फरफटत नेले यात ओमकार रमेश मोरे हे गंभीर जखमी झाले त्यांना लातूर येथे उपचारासाठी नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला,तर एका जखमी व्यक्तीवर उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.जळकोट रोडवर नेहमी अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असून कॅप्टन कृष्णकांत चौक ते म्हाडा पर्यंत ठिक ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावे अन्यथा आंदोलन करू असा इशारा माजी नगरसेवक फयाज शेख यांनी प्रशासनास दिला.

Post a Comment

0 Comments

जाहिरात