*महात्मा बसवेश्वर महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन आपण जीवनाची वाटचाल करावी : क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे*
*उदगीर* : महात्मा बसवेश्वर यांनी जातिव्यवस्था आणि हिंदू धर्मातील इतर वाईट गोष्टींविरुद्ध संघर्ष केला. महात्मा बसवेश्वर यांनी 800 वर्षांपूर्वी महिलांवरील अत्याचार संपवण्यासाठी लढा देवुन त्या काळात उच्च-नीच भेदभाव होता तो नष्ट करण्यासाठी लढा उभारला. सामाजातील जातीवादाच्या विरोधात लढा देवुन महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंटपाच्या माध्यमातून पहिल्या लोकसंसदेची सुरुवात केली त्यांच्या जीवनात त्यांनी जे कार्य केले ते लोककल्याणासाठीच होते म्हणून जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन आपण सर्वांनी आपल्या जीवनाची वाटचाल करावी असे मत क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते महात्मा बसवेश्वर यांच्या ८९३ व्या जयंतीनिमित्त उदगीर शहरातील आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, सुंदर बोंदर, माजी उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, ज्येष्ठ समाजसेविका लक्ष्मीबाई पांढरे, प्रा.मल्लेश झुंगास्वामी, बाबुराव पांढरे, भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा उत्तरा कलबुर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, भाजपाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, माजी नगरसेवक गणेश गायकवाड, सुभाष धनुरे, कुणाल बागबंदे, अमोल अनकल्ले, अॅड. महेश मळगे, साईनाथ चिमेगावे, सरोजा वारकरे, अमोल निडवदे, विजयकुमार चवळे, रेखा कानमंदे, चंदा बिरादार, वर्षाराणी धावारे, राजकुमार बिरादार, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी,
महिलांवरील अत्याचार संपवण्यासाठी महात्मा बसवेश्वरांनी लढा देवुन समाज व्यवस्था परिवर्तन करण्यामध्ये त्यांनी मोठे योगदान दिले.मठ आणि मंदिरांमधील वाईट प्रथा, अंधश्रद्धा ही त्यांनी दुर केल्या. लिंग, जात, सामाजिक स्थिती या गोष्टींचा विचार न करता सर्व लोकांना समान संधी देण्याचे महात्मा बसवण्णांनी सांगितले.
चांभार, कुंभार, तेली, न्हावी, परीट, शेतकरी, शेतमजुर सर्व जातीधर्माचे स्त्री - पुरुष या सभेचे सदस्य होते. महात्मा बस्वेश्वर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन आपण सर्वांनी जीवनाची वाटचाल करावी असे ना.बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व समाजातील प्रतिष्ठित नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments