Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

चाकूर तालुक्यात वीज पडून दोघे ठार,तर निलंगा तालुक्यात आंब्याचे झाड कोसळून एक जण ठार

चाकूर तालुक्यात वीज पडून दोघे ठार,तर निलंगा तालुक्यात आंब्याचे झाड कोसळून एक जण ठार

लातूर:चाकुर तालुक्यातील महाळंगी ता.चाकुर २६ मे रोज रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास वीज कोसळून शिवाजी नारायण गोमचाळे अंदाजे वय ३५ वर्षे व ओम  लक्ष्मण शिंदे अंदाजे वय ३० वर्षे याचा जागीच मृत्यू झाला आहे,तर शिवनखेड तालुका चाकूर येथील श्री प्रभू रामा कोपले यांची म्हैस झाडाखाली बांधली असता वीज कोसळून मयत झाली आहे.
निलंगा तालुक्यातील पानचिंचोली  येथील बळीराम व्यंकट हणमंते वय ३५ वर्ष यांच्या अंगावर आंब्याचे झाड पडुन ठार झाले आहेत त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले व वडील आहेत.तर शेळगी तालुका निलंगा येथील शेतकरी दत्तात्रय गोविंद रोडे यांची  म्हैस विज पडून ठार झाली आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौ.हालकी येथे २६ मे रोज रविवारी पाच वाजता श्री गंगाधर माधवराव बामनकर यांची एक म्हैस वीज पडून मयत झाली.
लातूर तालुका येथील तांदुळजा  येथे वीज पडून ईश्वर सराफ यांची एक म्हैस आणि मौजे काटगाव (कृष्णानगर तांडा) तालुका लातूर येथील विठ्ठल राठोड यांची म्हैस विज पडून मयत झाली आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात