Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

सोमनाथपूर रोड गांधी नगर येथे एकास मारहाण तिघांवर ऑट्रासिटीचा गुन्हा दाखल

सोमनाथपूर रोड गांधी नगर येथे एकास मारहाण तिघांवर ऑट्रासिटीचा गुन्हा दाखल

उदगीर:शहरातील सोमनाथपूर रोड गांधी नगर मौलाना आझाद शाळेसमोर एकास २६ मे रोज सांयकाळी साडे पाच वाजता मारहाण केल्याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात तिघांवर ऑट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,सोमनाथपूर रोड गांधी नगर येथे फिर्यादी राहुल नरसिंग कांबळे वय ४४ वर्ष माजी सैनिक यांना आरोपीने संगनमत करून फिर्यादीची मोटारसायकल अडवून दारू आणून तू कोणाला विकत आहेस म्हणून आरोपीने फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण करून दारूच्या बॉटलीने फिर्यादीच्या डोक्यात मारून दुखापत केली,व फिर्यादीच्या हातातील ३६ हजार ८०० रुपयांची पाच ग्रॅम सोन्याची अंगठी जबरदस्तीने चोरून घेऊन गेले,राहुल नरसिंग कांबळे यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात आरोपी जाकेर जहागीरदार वय ३४ वर्ष,फिरोज वय २८ वर्ष राहणार मुसा नगर उदगीर व एक अनोळखी जाडसर व्यक्ती वय ३० वर्ष यांच्यावर गुरंन १४२/२४ कलम ३९४,३४१,३४ भादवी सहकलम ३ (२) (५) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती कायदा १९८९ नुसार २६ मे रोज रविवारी सहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे,या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हे करीत आहेत,

Post a Comment

0 Comments

जाहिरात