स्व. लक्ष्मीकांत हलकीकर स्मृती सेवागौरव पुरस्कार बस्वराज पैके यांना जाहीर
उदगीर : येथील ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक स्व. लक्ष्मीकांत हलकीकर स्मृती सेवागौरव पुरस्कार लातूर येथील ज्येष्ठ समाजसेवक बस्वराज पैके यांना जाहीर करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण लवकरच उदगीर येथे एका कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ पत्रकार स्व. लक्ष्मीकांत हलकीकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सेवागौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. यापूर्वी एचआयव्ही बाधित विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या हासेगाव ता. औसा येथील रवी बापटले, दिव्यांगासाठी काम करणारी संस्था संवेदना प्रकल्प हरंगुळ ता.जि. लातूर, मूकबधिरांसाठी काम करणाऱ्या सोलापूर येथील उर्मिला आगरकर व महिलांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या पारधेवाडी ता. औसा येथील छाया काकडे यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
यावर्षी लातूर येथील दिव्यांगासाठी काम करणारे बस्वराज पैके यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
श्री पैके हे स्वतः दिव्यांग असल्याने त्यांना दिव्यांगाच्या प्रश्नांची जाणीव आहे. सर्व प्रकारच्या दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व प्रकारे प्रयत्न करीत असून राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्था सिकंदराबाद यांच्या सौजन्याने लातूर व धाराशिव जिल्ह्यातील ९३५ बौद्धिक दिव्यांगजन विद्यार्थ्यांना शैक्षणिक टी. एल. एम. कीट चे वितरण केले आहे. कोविड १९ च्या काळात लातूर जिल्ह्यातील ३२०० दिव्यांगांना घरपोच अन्नधान्य कीट वितरीत करण्यात त्यांचा मोठा पुढाकार राहिला आहे. जवळपास ९५०० दिव्यांग जणांना साह्यभुत साधनाचे वितरण करण्यात आले. कोविड काळात लातूर शहरातील व जिल्ह्यातील ५००० दिव्यांग व्यक्ती चे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. सामाजिक प्रश्नावर जनजागृती कार्यक्रम, जलसंधारण, व्रुक्षारोपन, नेत्रदान व आवयवदान याबाबतीत जनजागृती. दिव्यांग व्यक्ती च्या विकासासाठी श्री बस्वराज पैके सदैव तत्पर राहून काम करीत आहेत. यापूर्वी त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
बस्वराज पैके यांना पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती निवड समितीचे संयोजक विशाल हलकीकर, विक्रम हलकीकर, मोतीलाल डोईजोडे व प्रशांत मांगुळकर यांनी दिली आहे.
0 Comments