उदगिरात लोकांच्या भांडणाची विचारणे पडले महागात;
उदगीर : प्रतिनिधी
उदगीर शहरातील सोमनाथपूर रोडने पायी जात असताना रस्त्यावरील भांडण करणाऱ्यांना काय झाले. असे विचारले असता शिविगाळ करीत लाकडे जबर मारहाण केली. याप्रकरणी सोमवारी (२७ मे) उशिरा रात्री उदगीर शहर पोलीस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.२६ मे रोजी सायंकाळी शहरातील सोमनाथपूर रोडने जात असताना मौलाना आझाद शाळेसमोर रोडवर भांडण चालु असलेले पाहुन यातील आरोपीस काय झाले म्हणुन फिर्यादीने विचारले असता आरोपीने फिर्यादीस अश्लील शिवीगाळ करुन लाकडाने दोन्ही हातापायावर मारुन फिर्यादीचा उजवा व डावा पाय फ्रकचर करुन गंभीर दुखापत केली. व तुला पण खत्म करतो असे म्हणुन जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी इसा शेख (जहागीरदार)
(रा. दर्गा परिसर मुसा नगर उदगीर) यांच्या फिर्यादीवरुन उदगीर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.१४४/२०२४ कलम ३२६, ३२४, २९४, ५०४, ५०६ भादविनुसार राहुल कांबळे (रा.फुले नगर उदगीर) याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल गायकवाड हे करीत आहेत.
0 Comments