हत्तीबेट परिसरातील वनविभागाच्या विहिरीत आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह,ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
उदगीर तालुक्यातील हत्तीबेट परिसरातील वनविभागाच्या विहिरीत एका ३५ ते ४० वर्ष वयाच्या अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळल्याची घटना २५ मे रोज शनिवारी सकाळी १० वाजेच्या दरम्यान उघडकीस आली आहे,पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की हत्तीबेट परिसरात असलेल्या वनविभागाच्या विहिरीत अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह फुगलेल्या अवस्थेत पाण्यावर तरंगताना वनविभागाने कर्मचारी राम माधव बतले यांच्या निदर्शनास आले,या घटनेची तात्काळ माहिती त्यांनी उदगीर ग्रामीण पोलिसांना दिली,ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन विहिरीत तरंगत असलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उदगीर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,सदरील मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न ग्रामीण पोलीस हे करीत आहेत,राम माधव बतले यांच्या माहितीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ३४/२४ कलम १७४ सीआरपीसी प्रमाणे २५ मे रोज शनिवारी नोंद करण्यात आली आहे, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तारू हे करीत आहेत .
0 Comments