खा.काळगेच्या विजयाचा अभिषेकांने अतनूरात जल्लोष
लातूर लोकसभा मतदार संघातून अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे डॉ.शिवाजी बंडप्पा काळगे प्रचंड बहुमताने विजयी झाल्यास अतनूर येथील संजीवन जिवंत समाधी घेतलेले श्री.घाळेप्पा स्वामी महाराज तथा काशी विश्वनाथ महाराज मठ संस्थानात सोमवारचा जल अभिषेकांने जल्लोष करण्याचे वृत्त घेतलेले येथील माजी सैनिक तथा पिंढयान पिढ्यांचे काँग्रेस पक्ष समर्थक काँग्रेस जळकोट तालुकासरचिटणीस अरविंद सासट्टे अतनूरकर यांनी आज सोमवारी दि.१० जून रोजी सकाळी हा कार्यक्रम संपन्न केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी मोठया प्रमाणात हजेरी लावत ढोल ताशांच्या तालावर नाचत, फटाके वाजवून, पेढे व प्रसाद वाटप करित जल्लोष साजरा केला.
या वेळी काँग्रेस आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा शीलाताई पाटील राजूरकर अतनूर-गव्हाणकर, राष्ट्रवादीचे राज्याचे युवक मराठवाड्याचे युवानेते चंदन पाटील नागराळकर, गजानन सताळकर, राष्ट्रवादीचे नेते शिवाजी मुळे, बँकेचे संचालक तथा तालुकाअध्यक्ष मारोती पांडे, ज्ञानेश्वर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती जळकोटचे संचालक आशिष पाटील राजूरकर, शिवसेनेचे जळकोट तालुकाप्रमुख मुक्तेश्वर पाटील, जळकोट तालुकासरचिटणीस तथा माजी सैनिक अरविंद सासट्टे अतनूरकर, ओबीसींचे तालुकासचिव गोविंद कोकणे, अतनूर तंटामुक्त अध्यक्ष मगदूम मुंजेवार, संग्राम घुमाडे, नितीन सोमुसे, कैलास सोमुसे-पाटील, शफियोददिन मुंजेवार, अकबर आत्तार, अहेमद शेख, पाटील सह अनेक नेते, कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments