Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उदगीर येथील राजस्थानी मल्टीस्टेट को ऑप,सोसायटीने ठेवीदारांना १२ कोटीचा लावला चुना ,शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

उदगीर येथील राजस्थानी मल्टीस्टेट को ऑप,सोसायटीने ठेवीदारांना १२ कोटीला लावला चुना ,शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


उदगीर/प्रतिनिधी
उदगीर:शहरात असलेल्या राजस्थानी मल्टीस्टेट को ऑप. क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाने ठेवीदारांना १२ कोटी रुपयांना चुना लावला,याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात संचालक मंडळाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,पोलिसांनी दिलेली माहिती अशी की राजस्थानी मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी परळी वैजनाथ शाखा लासुने कॉम्प्लेक्स देगलूर रोड उदगीर येथील संचालक मंडळाने संगनमत करून लोकांना साडे पाच वर्षात पैशाचे दाम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून तसेच तेरा महिन्यासाठी ठेवीवर १२.५% व्याजाचे आमिष दाखवून, त्याचबरोबर पिग्मीच्या माध्यमातून लोकांकडून पैसे जमा करून दिनांक १९ नोव्हेंबर २०११ ते ३ जून २०२४ पर्यंत जवळपास ९७० लोकांची फसवणूक करून १२ कोटी रुपयांना चुना लावला,धनराज विरशेट्टी बिरादार वय ६३ वर्ष राहणार विद्या विहार कॉलनी शेल्हाळ रोड उदगीर यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात एकूण २० लोकांवर गुरंन १४८/२४ कलम ४२०,४०६,४०९,१२० (ब) ३४ आयपीसी ३ एम पी आय डी ऍक्ट नुसार ३ जून रोज सोमवारी सांयकाळी सहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन काळे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात