जे जे फाउंडेशनच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कौळखेड येथे वृक्षांची लागवड
उदगीर:जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोज बुधवारी उदगीर तालुक्यातील कवळखेड येथे श्री संगमेश्वर देवस्थान परिसरात जेजे फाउंडेशनच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षांची लागवड करण्यात आली, या मध्ये चिंच, सिताफळ, करंजी, लिंब, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचे वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी जे जे फाउंडेशनचे अध्यक्ष. प्रेमसागर बिरादार कवळखेडकर, सहसचिव. विशाल स्वामी उदगीरकर, ओमकार भंगुरे, श्यामा पवार, समर्थ भंगुरे, स्वरूप पुणेकर,अभिषेक स्वामी, सुमित लाल, आदित्य पाटील, वैष्णवी वाघमारे, अश्विनी दळवे आदी फाउंडेशनचे पदाधिकारीउपस्थित होते.
0 Comments