Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

बावलगाव शिवारात दोघांना धुरा का फोडलास म्हणून कत्तीने व कुऱ्हाडीने मारहाण..

बावलगाव शिवारात दोघांना धुरा का फोडलास म्हणून कत्तीने व कुऱ्हाडीने मारहाण..

६ जणांविरुद्ध उदगिरात गुन्हा दाखल..

उदगीर : प्रतिनिधी
बावलगाव (ता.चाकूर) शेत शिवारात आमचा धुरा का फोडलास म्हणून दोघांना कत्तीने व कुऱ्हाडीने मारुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी मंगळवारी (४ जून) रात्री उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.४ जून रोजी दुपारी बाराच्या सुमारास बावलगाव शिवारात आरोपीनी गैरकायदयाची मंडळी जमवुन फिर्यादी हा शेतात काम करत असताना शेतातील आमचा धुरा का फोडलास म्हणून शिवीगाळ करून फिर्यादीला कुऱ्हाडे डोक्यात मारुन गंभीर दुखापत केली. व आरोपी कत्तीने खांद्यावर मारून दुखापत केली, व ढकलुन खाली पाडले लाथाबुक्याने मारहाण केली, व तसेच काठीने मारहाण केली, फिर्यादी हा उपचार करणे कामी सरकारी दवाखाना उदगीर येथे गेला असता फिर्यादीचे भाऊ यास लक्षण उर्फ बुध्दसंदेश कांबळे यांने त्याचे हातातील कुऱ्हाडीने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. तसेच रामदासस कांबळे, प्रकाश काबळे यांनी देखील आकाश यास मारहाण करन शिवीगाळ करून तुम्ही आमच्या नादी लागला त तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.

    याप्रकरणी अतुल नवनाथ शांबळे (रा. बावलगाव ता, चाकूर) यांच्या फिर्यादीवरुन उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात बुध्वसंदेश कांबळे, भरत कांबळे, रामदास कांबळे, प्रकाशक कांबले, शांतीलाल कांबळे (रा. बावलगाव, ता. चाकूर) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तारु हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात