ग्रामीण पोलिसांचे तालुक्यात विविध ठिकाणी अवैध दारूवर छापे २० हजारांची दारू केली जप्त
उदगीर:उदगीर ग्रामीण पोलिसांनी दिनांक ३ जून ते ६ जून पर्यंत तालुक्यात विविध ठिकाणी अवैध दारूवर छापे टाकून २० हजार १८५ रुपयांची दारू जप्त केली असून ९ आरोपीविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की उदगीर ग्रामीण पोलिसांनी तालुक्यातील लोणी,धोंडी हिप्परगा,लोहारा,एमआयडीसी लोणी,शंभू उमरगा,तीवटग्याळ या ठिकाणी ग्रामीण पोलिसांनी देशी दारूवर छापा टाकून आरोपीने विनापरवाना देशी दारूची चोरटी विक्री करीत असताना आरोपिकडून एकूण १७ हजार १८५ रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली तर जानापूर येथे दोन ठिकाणी हातभट्टी गावठी दारूवर छापा टाकून ३ हजार रुपयांची गावठी दारू असा एकूण २० हजार १८५ रुपयांची अवैध दारू जप्त करून ९ आरोपीविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले, ६ जून रोज गुरुवारी दोन वाजता पोलीस हेडकॉन्स्टेबल नामदेव संतराम चेवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पडिले हे करीत आहेत.३ जून ते ६ जून पर्यंत केलेल्या कारवाईत २० हजार १८५ रुपयांची दारू जप्त करण्यात आली.तर तीन ठिकाणी तीवटग्याळ येथे देशी दारूवर छापा टाकला.
0 Comments