विसावा बार मध्ये आर्डरच्या कारणावरून वेटरला दगडाने मारहाण; एकाविरुध्द गुन्हा..
उदगीर शहरातील देगलूर रोडवरील विसावा बारमध्ये आर्डर घेण्याच्या कारणावरून दगडाने मारुन वेटरचे डोके फोडले. याप्रकरणी गुरुवारी (६ जून) रात्री अकराच्या सुमारास उदगीर शहर पोलीस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.६ जून रोजी रात्री सातच्या सुमारास शहरातील देगलूर रोडवरील विसावा बारमध्ये आरोपीने फिर्यादिस विसावा बारमध्ये काम करीत असताना आरोपीने माझी ऑर्डर का घेत नाहीस लवकर आर्डर घे या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करून हातात दगड घेवून फिर्यादीचे डोकीत मारून जखमी केले.
याप्रकरणी शंभू महादेव माने (रा.वडार गल्ली उदगीर ता उदगीर) याच्या फिर्यादीवरुन उदगीर शहर पोलीस ठाण्यात बब्बू शेख (रा. हावगीस्वामी चौक उदगीर) याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोहिते हे करीत आहेत.
0 Comments