Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यावर कडक कारवाई करणार,पोलीस निरीक्षक अरविंद पवार

सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यावर कडक कारवाई करणार,पोलीस निरीक्षक अरविंद पवार

उदगीर:पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण हद्दीतील सुजाण नागरिकांना पोलीस ठाणे उदगीर ग्रामीणच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येते की,लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने दिनांक १० मार्च २०२४ पासून ते दिनांक ६ जून २०२४ रोजी पावेतो आदर्श आचारसंहिता अंमलात असून लातूर सह संपूर्ण देशभरात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा निकाल दिनांक ४ जून रोज मंगळवारी जाहीर होणार असून त्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की,कोणीही नागरिक सदर निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप ग्रुप व इतर तत्सम एप्लीकेशनच्या माध्यमाद्वारे कोणत्याही समाजाच्या,जातीच्या, धर्माच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट, कॉमेंट्स, स्टोरी, स्टेटस, डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमाद्वारे  करू नयेत.तसेच कोणाचेही विरोधात घोषणाबाजी करू नये, डीजे वाजवणार नाहीत,फटाके फोडणार नाहीत. तसेच विनापरवाना विजयी मिरवणूक काढू नये. व्हाट्सअप ग्रुपचे ॲडमिन यांनी दिनांक ३ जून २०२४ ते दिनांक ६ जून २०२४ या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपच्या सेटिंग मध्ये only admin करून बदल करून घ्यावा, जेणेकरून ग्रुप मधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुप वर टाकणार नाहीत जर ऑडमिन यांनी सेटिंग मध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात