Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उदगीर विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला सुटल्यास निवडणूक लढविण्यास इच्छुक,प्राचार्य गोविंद भालेराव

उदगीर विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला सुटल्यास निवडणूक लढविण्यास इच्छुक,प्राचार्य गोविंद भालेराव

उदगीर :-  गेल्या अनेक वर्षांपासून उदगीर हे काँग्रेस पक्षाला बळकटी देणारा विधानसभा मतदारसंघ आहे.सातत्याने उदगीरची नगरपालिका काँग्रेस पक्षाच्याच ताब्यात होती. उदगीर तालुक्यात पक्षाचे अनेक जिल्हा परिषदेचे   सदस्य राहिले आहेत. विधानसभा सभा कार्यक्षेत्रात अनेक ग्रामपंचायती, उदगीर व जळकोट कृषी उत्पन्न बाजार समिती ही काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहे.काॅग्रेस पक्षाचा मी स्वतः विद्यार्थीदशेपासून एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते मा.शिवराज पाटील चाकूरकर साहेब,स्व.लोकनेते विलासराव देशमुख साहेब, सहकारमहर्षी मा.दिलीपराव देशमुख साहेब, महाराष्ट्राचे आशास्थान माजी मंत्री मा.अमितभैय्या देशमुख साहेब,युवकांचे प्रेरणास्थान मा.आ.धीरजभैय्या देशमुख,स्व.माजी आमदार चंद्रशेखर भोसले साहेब यांच्या नेतृत्त्वावर विश्वास  ठेवून पक्षाचे मी निष्ठेने कार्य करीत आलो आहे.मी विद्यार्थी काँग्रेस,युवक काँग्रेसाचा तालुका व जिल्हा प्रतिनिधी, अनुसूचित जाती काँग्रेसचा तालुका अध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस म्हणून गेल्या विस वर्षांपासून पक्ष वाढीसाठी प्रामाणिक कार्य करीत आहे.मला २००७ मध्ये पंचायत समिती नागलगांव गणातून पक्षाने निवडणूक लढविण्याची संधी दिली होती. सामाजिक बांधिलकी म्हणून विविध सामाजिक, सांस्कृतिक संघटना व चळवळीत मी अग्रस्थानी राहून कार्य करीत आहे.इ.स.१९९९ पासून झालेल्या लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत अत्यंत निष्ठेने पक्षाचे सक्रिय कार्य करीत आलो आहे.२०१४ ची विधानसभा निवडणूक सोडली तर गेल्या अनेक वर्षांपासून उदगीर विधानसभाची जागा मित्र पक्षाकडे राहिल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना विधानसभेची निवडणूक लढविण्याची संधी मिळाली नाही.इ.स २०२४ निवडणूक 
 उदगीर-जळकोट विधानसभाची जागा काँग्रेस पक्षाला सोडल्यास मी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात