रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पाठीमागे अर्धवट जळालेला व्यक्ती स्वतः जाळून घेतला,जबाबातून माहिती समोर
उदगीर:शहरा लगत असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पाठीमागे रेल्वे रुळाच्या जवळ एक व्यक्ती अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळल्याची घटना पाच ऑगस्ट रोज सोमवारी सकाळी साडे आठ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली आहे,थोडक्यात माहिती अशी की बिदर रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पाठीमागे रेल्वे रुळाजवळ एक व्यक्ती अर्धवट अवस्थेत जळाला असून तासाभरापासून तडफडत आहे अशी माहिती नागरिकांनी उदगीर ग्रामीण पोलिसांना दिली, ग्रामीणचे पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल बाबुराव नागरगोजे,पोलीस नाईक मुबारक मुल्ला,पोलीस नाईक युवराज जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत अर्धवट जळालेल्या व्यक्तीला शासकीय रुग्णवाहिकेतून उदगीर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र येथील डॉक्टरांनी त्या व्यक्तीस लातूरला उपचारासाठी पाठवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली,सदर व्यक्तीला पोलिसांकडून विचारणा करण्यात असता मैं खुद बॉटल मे पेट्रोल लेके ये काम किया है असे जबाबात म्हंटल्याची माहिती समोर आली आहे.कोठा अजय राहणार डी/ओ:बोडला वेंकटेश,४-५४ लक्ष्मी देवारा एस्ट्रीट,चेनुर जि.आदीलाबाद आंध्रप्रदेश असे जाळून घेतलेल्या व्यक्तीचे नावं असून तो पेशाने अभियंता असल्याची माहिती समोर आली आहे, स्वतः का जाळून घेतला याचे कारण मात्र अद्याप समजले नसून पोलिस त्यांची कसून चौकशी करीत आहेत.
0 Comments