दावनगावं येथे पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
उदगीर तालुक्यातील दावनगावं येथे पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा डबक्याच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ४ ऑगस्ट रोज रविवारी दुपारी घडली आहे.थोडक्यात माहिती अशी की दावनगावं येथील रुद्र माधव भोळे वय १२ वर्ष,शुभम परशुराम हुंजे वय १२ वर्ष या दोन मुलांनी डबक्यात पोहण्यासाठी गेले होते. दोघा मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे,या घटनेने दावनगावं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 Comments