Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

दोन मुली झाल्या म्हणून विवाहीतेचा छळ; तिघांविरुध्द गुन्हा..

दोन मुली झाल्या म्हणून विवाहीतेचा छळ; तिघांविरुध्द गुन्हा..

उदगीर : प्रतिनिधी
 उदगीर शहरातील गोपाळ नगर येथील विवाहीतेस दोन मुली झाल्या म्हणून सासरच्या लोकांनी शारिरीक मानसिक छळ केल्या प्रकरणी मंगळवारी (६ ऑगस्ट) रात्री आठच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात सासरच्या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.२८ एप्रिल २०१३ ते ८ ऑगस्ट २०२३ दरम्यान सासरी रेल्वे स्टेशन समोर गोपाळनगर उदगीर येथे आरोपीनी संगणमत करुन विवाहीतेस दोन मुली झाल्या म्हणुन वारंवार उपाशीपोटी ठेवुन, जाचजुलुम करुन, सतत पैश्याची मागणी केली व लाथाबुक्याने मारहाण करुन घराबाहेर काढुन तु जर परत घरी आलीस तर तुला खतम करुन टाकतो म्हणुन जिवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी मिरा सुग्रीव जायभाये (रा.रेल्वे स्टेशन समोर, गोपाळनगर उदगीर हा.मु  डोंगरशेळकी ता. उदगीर) यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं.४२९/२०२४ कलम ४९८(अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ भादविनुसार सुग्रीव मोतीराम जायभाये, त्रिवेणीबाइ मोतीराम जायभाये (दोघे रा.रेल्वे स्टेशन समोर गोपाळनगर उदगीर), संदीप व्यंकट केंद्रे (रा.नावंदी ता. उदगीर) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकाँस्टेबल तुडमे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात