Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

तुफान दगडफेक सुरू असल्याची खोटी माहिती देणाऱ्या तरुणांला पडली महागात,गुन्हा दाखल

तुफान दगडफेक सुरू असल्याची  खोटी माहिती देणाऱ्या तरुणांला पडली महागात,गुन्हा दाखल

उदगीर/प्रतिनिधी
उदगीर:नाईक चौक भागात तुफान दगडफेक होत आहे अशी खोटी माहिती एका तरुणांने ११२ कॉल करून दिल्या प्रकरणी खोटी माहिती देणाऱ्या तरुणावर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात १० सप्टेंबर रोज मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की ९ सप्टेंबर रोज सोमवारी रात्री १० वाजता नाईक चौक परिसरात तुफान दगडफेक सुरू आहे असा ११२ वर कॉल आला.तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नाईक चौक परीसर पूर्णपणे पिंजून काढला पण कुठेही असा प्रकार घडला नसल्याचे निदर्शनास आले.आरोपीने प्रशासनाला त्रास व्हावा या उद्देशाने डायल ११२ कॉल करून लोकसेवकाला त्रास होईल हे माहीत असताना सुद्धा डायल ११२ वर कॉल करून खोटी माहिती दिली. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन अंगद नाडागुडे यांच्या फिर्यादीवरून ११२ वर कॉल करून खोटी माहिती देणारा आरोपी गोंडराज यशवंत कांबळे वय ३४ वर्ष राहणार शिवशक्ती नगर उदगीर यांच्यावर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरंन ५०३/२४ कलम २१७ भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शिरशे हे करीत आहेत. खोटी माहिती देणाऱ्या तरुणांला पोलिसांनी ताब्यात घेऊन तरुणाला नोटीस देऊन सोडण्यात आले.

Post a Comment

0 Comments

जाहिरात