*मी उदगीरचे पालकत्व स्वीकारून जबादारीने काम केले : क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे*
*उदगीर* : मागील पाच वर्षाच्या कार्य काळात राज्य शासनाकडून पाच ते सहा हजार कोटींचा निधी मतदार संघासाठी उपलब्ध करून उदगीर जळकोट तालुक्याचा कायापालट करण्यासाठी मी उदगीर मतदार संघाचे पालकत्व स्वीकारून जबादारीने काम केले असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी केले.
ते उदगीर शहरातील विविध गणेश मंडळांच्या भेटी दरम्यान नागरिकांना संबोधित करताना बोलत होते.
यावेळी माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, रमेश अंबरखाने, मनोज पुदाले, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस समीर शेख,शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, छावाचे दत्ता पाटील, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, विजय निटुरे, नरसिंग शिंदे,उदयसिंह ठाकुर, अजित राठोड, राहुल सातापुरे, बाबुराव पांढरे, दत्ता पाटील, गुरुप्रसाद पांढरे, रामदास माळेगावे, रंजित कांबळे, प्रकाश गायकवाड, अंकुश गादेवार, अनुराग वजनम, आदीसह तिरुपती महिला भजनी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी, उदगीर शहरातील गणेश मंडळांनी समाज प्रबोधन करुन समाजाला दिशा देण्याचे काम सर्व गणेश मंडळाच्या वतीने व्हावे अशी ईच्छा व्यक्त करुन मागील ४ - ५ वर्षाच्या काळात रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आदी सुविधा नागरीकांना आपण पुरविल्या आहेत. आता दळणवळणाच्या बाबतीत आपण सक्षम असुन येत्या काळात मेडिकल काॅलेज, विमानतळ, एम.आय.डी.सी ची निर्मिती करुन मोठे उद्योग मतदार संघात उभारुन हजारो तरूणांना रोजगार निर्मिती करुन देणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य नुकताच राष्ट्रपती महोदयांचा दौरा आपल्या उदगीरला झाल्याने आपल्या उदगीरचे नाव जगामध्ये गेले आता आपण सर्वांनी हे उदगीरचे वैभव जपले पाहिजे असे सांगितले.
यावेळी विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments