उदगिरात मुलींचा शारीरिक विनयभंग आरोपींवर ग्रामीण पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
उदगीर शहरात एका १८ वर्षीय मुलींचा शारीरिक विनयभंग केल्याप्रकरणी आरोपींवर ग्रामीण पोलीस ठाण्यात ११ सप्टेंबर रोज बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की उदगीर शहरातील एका १८ वर्षाच्या मुलीला आरोपीने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन मार्च २०२३ ते १० सप्टेंबर २०२४ पर्यंत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवून पीडित मुलीला गर्भनिरोधक गोळ्या खायल्या दिल्या.सदर गोष्ट कोणाला सांगितल्यास तुझ्या सकट तुझ्या वडिलांना जाळून मारून टाकतो अशी जीवे मारण्याची धमकी दिली व १० सप्टेंबर रोजी रात्री पिडीत मुलींच्या घरासमोर आरोपीने मारहाण केली. पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी योगेश देबडवार यांच्यावर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरंन ५०६/२४ कलम ६४(२),(१),(M),११५(२),३५१(२),३५२ भारतीय न्याय संहिता ४,६,८ पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक कदम हे करीत आहेत.
0 Comments