करखेली येथे विवाहितेचा सोने व पैशासाठी छळ, दोघांविरुध्द गुन्हा..
उदगीर तालुक्यातील करखेली येथील विवाहितेस माहेरहून सोने व पैसे घेऊन ये म्हणून मानसिक, शारीरिक छळ केल्याप्रकरणी सोमवारी (९ सप्टेंबर) सायंकाळी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात सासरच्या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.५ ऑक्टोबर २०१४ ते १८ ऑगस्ट २०१९ दरम्यान शेडोळ (ता.निलंगा) येथे सासरच्या लोकांनी संगनमत करुन विवाहितेस सोने व पैसे माहेरहुन घेवुन ये असे म्हणुन शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहाण करुन उपाशी पोटी ठेवुन शारीरिक व मानसिक छळ केला व धमकी दिली.
याप्रकरणी श्रध्दा ज्ञानेश्वर महाळंगे (वय ३० वर्ष, रा. शेडोळ ता. निलंगा हा.मु.करखेली ता. उदगीर) यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर शुक्राचार्य महाळंगे, शांताबाइ शुक्राचार्य महाळंगे (दोघे रा.शेडोळ ता. निलंगा) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाॅस्टेबल भिसे हे करीत आहेत.
0 Comments