Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

*निवडणूक खर्च तपासणीसाठी अनुपस्थित उदगीर, निलंगा मतदारसंघातील उमेदवारांना नोटीस*



*निवडणूक खर्च तपासणीसाठी अनुपस्थित उदगीर, निलंगा मतदारसंघातील उमेदवारांना नोटीस*

* निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. रामसिंह गुर्जर यांच्याकडून खर्चाची तपासणी

लातूर, दि. ९ : निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. रामसिंह गुर्जर यांच्या उपस्थितीत झालेल्या निवडणूक खर्चाच्या पहिल्या तपासणीला अनुपस्थित उदगीर, निलंगा मतदारसंघातील उमेदवारांना संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नोटीस बजाविल्या आहेत. उदगीर विधानसभा मतदारसंघातील ५ आणि निलंगा मतदारसंघातील ८ *उमेदवारांना* ही नोटीस बजावण्यात आली आहे.

निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. गुर्जर यांच्या उपस्थितीत उदगीर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची पहिली तपासणी ७ नोव्हेंबर रोजी उदगीर येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी मतदारसंघातील १३ उमेदवारांपैकी ८ उमेदवारांनी निवडणूक खर्च लेखे तपासणीसाठी सादर केले. यावेळी ५ उमेदवार गैरहजर होते. 

तसेच निलंगा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची पहिली तपासणी ८ नोव्हेंबर रोजी निलंगा येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात झाली. यावेळी १३ पैकी ५ उमेदवार उपस्थित राहिले. तसेच ८ उमेदवार गैरहजर होते. सर्व गैरहजर उमेदवारांना लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम ७७(१) नुसार संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नोटीस बजावून ४८ तासाच्या आत लेखी उत्तर देण्याबाबत कळविले आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात