उदगिरात महिलेच्या डोक्यात गॅस सिलेंडरने मारहाण; तिघांविरुध्द गुन्हा..
उदगीर शहरातील फुलेनगर येथे महिलेला शिविगाळ करुन डोक्यात गॅस सिलेंडरने मारुन जखमी केले. याप्रकरणी शुक्रवारी (८ नोव्हेंबर) दुपारी दोनच्या सुमारास उदगीर शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास शहरातील फुलेनगर येथील फिर्यादीचे घरासमोर अंगणात आरोपीनी संगनमत करुन फिर्यादीची मुलीगी कीर्ती हीस विनाकारण शिवीगाळ केली त्यावेळी फिर्यादीने माझ्या मुलीस शिवीगाळ का करता असे म्हणुन विचारले असता लखन लक्ष्मण वरदाळे यांनी तुम्ही माझ्या आई वडीलास का भांडण तक्रार करता त्यांना बोलायचे नाही असे म्हणुन फिर्यादीस व तिची मुलगी कीर्ती हीस धक्काबुक्की करुन रिकामे गॅस चे सिलेंडर फिर्यादीचे डोक्यात मारुन जखमी केले. सर्वानी मिळुन धककाबुक्की करुन शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी शंकुतला लखन वरदाळे (रा. फुले नगर उदगीर) यांच्या फिर्यादीवरुन उदगीर शहर पोलीस ठाण्यात लखन लक्ष्मण वरदाळे, लक्ष्मण वरदाळे, चिलकोताबाई लक्ष्मण वरदाळे (सर्व रा. फुलेनगर उदगीर) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल गायकवाड हू करीत आहेत.
0 Comments