नागलगाव येथे दादागिरी करतोस का म्हणून राॅडने मारहाण; दोघांविरुध्द गुन्हा..
उदगीर तालुक्यातील नागलगाव येथे एकाला तु तुझ्या भावाच्या जीवावर लय दादागिरी करतोस का म्हणून लोखंडी राॅडने मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी गुरुवारी (७ नोव्हेंबर) सकाळी अकराच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.६ नोव्हेंबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास नागलगाव येथील राजकुमार नागलगावे यांचे घराचे समोर रोडवर आरोपीतांनी संगणमत करुन फिर्यादीस तु तुझ्या भावावर लय दादागीर करत आहेस का असे म्हणुन रवी शेटकार यांनी गच्छीला धरुन धकाबुक्की केली असता पवन शेटकार यांनी त्याचे हातातील लोखंडी राडने डोक्यात व उजव्या पायावर मारुन जखमी केले आहे व फिर्यादीची पत्नी ही भांडण सोडवण्यसा आली असता तीस पण शिवीगाळ करुन तुम्हा दोघांना सोडणार नाही असे म्हणुन जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
याप्रकरणी धोंडुतात्या गुणवंत होन्ना (रा. नागलगाव ता. उदगीर) यांच्या फिर्यादीवरुन उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात रवी माधवराव शेटकार, पवन रवी शेटकार (दोघे रा. नागलगाव ता. उदगीर) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल शिरसे हे करीत आहेत.
0 Comments