*उमेदवारांनी निवडणुकीसाठी काढलेल्या बँक खात्यातूनच प्रचाराचा खर्च करावा-निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. रामसिंह गुर्जर*
लातूर, दि. ७ : निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने निवडणूक खर्चासाठी बँकेत स्वतंत्र बँक खाते काढणे आवश्यक आहे. या खात्यातूनच निवडणूक संबंधित खर्च भागविणे बंधनकारक असल्याचे निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. रामसिंह गुर्जर यांनी सांगितले. उदगीर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची प्रथम ताळमेळ बैठक 7 नाव्हेंबर, 2024 रोजी उदगीर उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात झाली यावेळी ते बोलत होते.
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राम बोरगावकर, राजेश लांडगे, सहायक खर्च निरीक्षक मनोहर वानखेडे, नायब तहसीलदार राजश्री भोसले, नायब तहसीलदार निखील घाडगे, नोडल अधिकारी खर्च सनियंत्रण कक्ष श्रीमती रंजना तरटे, लेखा पथकातील दत्तात्रय बरबडे, उपकोषागार अधिकारी व लेखा पथकातील सर्व कर्मचारी व उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी प्रथम लेखा तपासणीस उपस्थित होते.
निवडणूक खर्चाबाबत उमेदवारांनी दैनंदिन लेखे ठेवणे आवश्यक आहे. यासाठी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात यावी. निवडणूक खर्चासाठी उमेदवारांनी बँकेत खाते काढून निवडणूक प्रचाराचा खर्च या खात्यातून करण्याच्या सूचना निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. रामसिंह गुर्जर यांनी दिल्या. तसेच प्रचारासाठी वापरण्यात येणारी वाहने, इतर साहित्य याची परवानगी काढूनच्य त्याबाबींवर खर्च करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
******
0 Comments