*तुमच्या दारात येवून काम करुन देणारे एकमेव लोकप्रतिनिधी ना.संजय बनसोडे : माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे*
*उदगीर* : 2014 च्या निवडणुकीपासून आजतागायत उदगीर मतदार संघाच्या सेवेत एक जनसेवक म्हणून ज्यांनी काम केलं ते ना. संजय बनसोडे यांना आपण 2019 च्या निवडणुकीत आमदार केले. त्यानंतर त्यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उदगीरच्या विकासाचा रथ पुढे घेऊन गेला. तब्बल सहा हजार कोटी रुपयाचा विकास निधी मतदार संघात खेचून आणून सर्वांगीण विकास केला. एखाद्या सर्वसामान्य माणसापासून ते मोठ्या नेत्यापर्यंत सामाजिक असो या वैयक्तिक त्यांची कामे तुमच्या दारात येवून संबंधित कसलेही काम करुन देणारे राज्यातील एकमेव लोकप्रतिनिधी ना.संजय बनसोडे असल्याचे मत ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार ना.संजय बनसोडे यांच्या प्रचारार्थ गावभेट दौरा निमित्त माळेवाडी, मादलापुर व नेत्रगाव येथील ग्रामस्थांशी संवाद साधताना बोलत होते
यावेळी माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हा बँकेचे संचालक भगवानराव पाटील तळेगावकर, माजी जि.प. उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, माजी उपसभापती रामराव बिरादार, प्रा.श्याम डावळे, भरत चामले, बालाजी भोसले, शिवशंकर धुप्पे, प्रकाश राठोड, पंडित सुर्यवंशी, बस्वराज बाळे, धनाजी मुळे, डी.वाय. बिरादार, सरपंच रमेश मदनुरे, विजय निटुरे,अनिल मुदाळे, विकास जाधव, अमोल निडवदे, रमेश शेरीकर, धनाजी जाधव, मादलापुरचे सरपंच उदयसिंह मुंडकर, सतिश सुळे महाराज, जितेंद्र शिंदे, किशनराव बिरादार, सूर्यकांत पाटील, उमाकांत दाडगे, बसवराज बाळे, वसंत कडोळे, रंजित कांबळे, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री.राजेश्वर निटुरे यांनी यांनी,
गेल्या ५ वर्षात उदगीरच्या विकासाचा बॅकलाॅग ना.बनसोडे यांनी भरुन काढला. ग्रामीण भागातील रस्ते, वीज, पाणी व आरोग्याच्या सुविधा पुरविल्या, बंधारे बांधले, बॅरेजेस केले. महापुरुषांचे पुतळे, विविध इमारती उभारल्या मतदार संघातील विविध प्रश्न अतिशय तळमळीने सोडवणारा लोकप्रतिनिधी आम्ही पाहिले नाही म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आपण सर्वांनी मतदानादिवशी आपले महायुतीचे उमेदवार ना.संजय बनसोडे यांनाच घड्याळासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन निटुरे यांनी केले.
गावभेट दौरा करताना ना.संजय बनसोडे यांचा प्रत्येक गावातील महिलांनी औक्षण करुन आपल्या लाडक्या भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली. यावेळी माळेवाडी, मादलापुर, नेत्रगाव, येणकी, जकनाळ, बामणी, शेल्हाळ, शेल्हाळ तांडा, तोंडचिर, यासह विविध गावात ना.बनसोडे यांनी गावभेट दौरा करुन ग्रामस्थांशी संवाद साधला.
यावेळी महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- चौकट -
उदगीरच्या विकासासाठी आपण सर्वजन
पूर्ण ताकदीने ना.संजय बनसोडे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असुन उदगीर जिल्हा निर्मिती करण्यासाठी सदैव जनतेचा लोकसेवक म्हणून ना.बनसोडे काम करत आहेत. मागील कोरोना महामारीच्या काळात ना.संजय बनसोडे यांनी मतदार संघाची कुटूंबाप्रमाणे काळजी घेतली. महायुती सरकारने मराठा समाजाला विविध योजनेतून माध्यमातुन मदत केली आहे. शेतक-यांचे विजबील माफ केले. लाडक्या बहिणीची योजना आणली. विविध माध्यमातून महायुती सरकारने सर्वसामान्य माणसाला न्याय दिला असल्याचे जिल्हा बँकेचे संचालक
भगवान पाटील तळेगावकर यांनी सांगितले.
२) सकाळच्या प्रहरी महिला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळची प्रहर ही महिलांच्या कामाची वेळ असते. या व्यापातूनही या लाडक्या बहिणी आपल्या लाडक्या भावाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी उत्स्फूर्तपणे गावोगावी प्रचारात सहभागी होताना दिसत होत्या. लाडकी बहीण योजनेअंतर्गत उदगीर तालुक्यातील महिलांना मोठ्या संख्येने लाभ झाला असून या बहिणी आता संजय भाऊच्या विजयासाठी पुढाकार घेत आहेत.
*****************************
0 Comments