उदगीर शहरातील श्रीकृष्ण काॅलनी येथे घरफोडी; अज्ञात चोराविरुध्द गुन्हा
उदगीर : प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील निडेबन रोडवरील श्रीकृष्ण कॉलनी काॅलनी येथे एकाच्या घराचा कोंडा तोडून घरात प्रवेश करुन सोन्याची अंगठी व रोख रक्कम असे एकुण ३९ हजार रुपयांचा ऐवज चोरून घेऊन गेले. याप्रकरणी मंगळवारी (५ ऑक्टोबर) रात्री सव्वासातच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.२८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान फिर्यादी हे दिवाळीनिमित्त आपल्या गावी गेले असता घरात कोणी नसल्याचे फायदा घेत अज्ञात आरोपीने फिर्यादी हे भाडयाने राहत असलेल्या विजयकुमार रामनाथ पोकलवार यांचे घराचा कुलूप कोंडा तोडून आत प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटाचा कोंडा तोडून, लॉकरमध्ये ठेवलेली एक सोन्याची अंगठी वजन अंदाजे ५ ग्रॅम किंमत अंदाजे २८ हजार रुपये व रोख रक्कम ११ हजार रुपये असा एकूण ३९ हजार रुपयांचा ऐवज चोरून घेवून गेला.
याप्रकरणी नरेश भगवानराव बिरादार (रा. वलांडी ता. देवणी जि लातुर हा मु श्रीकृष्ण कॉलनी, निडेबन रोड, उदगीर) यांच्या फिर्यादीवरुन उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुध्द चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल आर.बी. नागरगोजे हे करीत आहेत.
0 Comments