धर्मवीर छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठान उदगीरच्या वतीने पहिला दिवा महामानवाला !
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजश्री शाहू महाराज चौक, महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, महर्षी वाल्मिकी चौक, जिवाजी महाले चौक, महात्मा बसवेश्वर पुतळा रेल्वे स्टेशन, शहीद कॅप्टन कृष्णकांत चौक, वसंतराव नाईक चौकात पहिला दिवा या देव माणसांसाठी ज्यांनी आपले जीवन प्रकाशमय केलेल्या राष्ट्रीय महापुरुष व समाजसुधारक महामानव यांच्या पुतळ्यासमोर धर्मवीर छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठान उदगीर च्या वतीने दिपोत्सव साजरा करण्यात आला.
दिवाळी किंवा दीपावली हा प्रकाशाचा हिंदू सण आहे, जो इतर रुपांत इतर भारतीय धर्मांमध्येही साजरा केला जातो. "अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे" प्रतीक म्हणून या सणाला ओळखतात. हिंदू चंद्रमास आश्विन (अमंता परंपरेनुसार) आणि कार्तिक या महिन्यांत म्हणजे सप्टेंबर आणि नोव्हेंबरच्या मध्यात दिवाळी साजरी केली जाते.हा उत्सव साधारणपणे पाच ते सहा दिवस चालतो.
विविध धार्मिक कार्यक्रम, देवता आणि व्यक्तिमत्त्वांशी दिवाळी जोडलेली आहे, जसे की राक्षस राजा रावणाचा पराभव करून राम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येत परतले. समृद्धीची देवी लक्ष्मी आणि बुद्धीची देवता आणि अडथळे दूर करणारा देव गणेश यांच्याशी देखील व्यापकपणे हा सण संबंधित आहे. इतर प्रादेशिक परंपरा या सणाला विष्णू, कृष्ण, दुर्गा, शिव, काली, हनुमान, कुबेर, यम, यमी, धन्वंतरी, किंवा विश्वकर्मा यांच्याशी जोडतात. प्रामुख्याने हिंदू सण असला तरी दिवाळीचे विविध प्रकार इतर धर्मांचे लोक देखील साजरे करतात. जैन लोक त्यांची स्वतःची दिवाळी पाळतात, जी महावीरांच्या अंतिम मुक्तिचे प्रतीक आहे.मुघल तुरुंगातून गुरू हरगोबिंद यांची सुटका झाल्याबद्दल शीख लोक बंदिछोर दिवस साजरा करतात.नेवार बौद्ध हे इतर बौद्धांच्या विपरीत लक्ष्मीची पूजा करून दिवाळी साजरी करतात, तर पूर्व भारत आणि बांगलादेशातील हिंदू सामान्यतः देवी कालीची पूजा करून दिवाळी साजरी करतात.
दिवाळी, ज्याला प्रकाशाचा सण म्हणूनही ओळखले जाते, अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे. संपूर्ण भारतामध्ये, हा आनंदाचा प्रसंग अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो, दिवे लावण्यापासून ते प्रियजनांसोबत मिठाई आणि गोष्टी शेअर करण्यापर्यंत. असाच हा आगळा वेगळा कार्यक्रमात करण्याचा नवतरुण उत्साही तरुणांचा जे की यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत कोणी कॉलेज कुमार आहेत तर कोणी सामाजिक क्षेत्रात काम करणारे तसेच विद्यार्थी तसेच जे की महामानवाचे राष्ट्रीय महापुरुषांच्या विचारावर चालणाऱ्या पगडा घेऊन समाज सुधारक महामानवाने दिलेल्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा याच्यावर चालणारे ह्या युवा नवतरुण पिढीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे ही नवतरुण युवक पिढी विशेष म्हणजे गरिबीतून चटके खाऊन 18 पगड जाती धर्मातील असून त्यांच्या आई-वडील स्वतः मोलमजुरी करणारे विविध दैनंदिन आपली घरातील घर परंपरा संसार वगैरे चालवून आपल्या मुलाबाळासाठी मोठे होण्याचे स्वप्न पाहून त्यांना आर्थिक बाजू मध्ये हातभार लावणारी यांची ही मुलं असल्यामुळे एक वेगळा संदेश सर्वसामान्य व्यक्तींना लाजवेल असे जे की वर्षातून जयंती मोठ्या मोठ्या देणग्या घेऊन जयंत्या साजरे करणाऱ्या आणि त्या जयंती मध्ये पण करून डान्स करणाऱ्या विविध गाण्यावर डान्स करणाऱ्यांचा सुद्धा हे लाजवणाऱ्या एक प्रकारे लाजवणारे या युवकांचे युवतींचे कार्य आहे हे इथे विशेष मांडावे वाटतं जे की दरवर्षी या महापुरुषांच्या जयंती साजरा करण्यासाठी मोठे मोठे राजकीय नेते राजकीय पुढारी गल्लीपासून दिल्लीपर्यंत चे राष्ट्रपती पासून पंतप्रधान पर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत गावातल्या सरपंचापासून ग्रामपंचायत सदस्या पासून आमदारांपासून लोकप्रतिनिधी पासून खासदारांपासून त्यांना नमन करणारे आजच्या दिवाळी उत्सवामध्ये त्यांना एक दिवा महामानवांच्या नावाने लावण्यासाठी त्यांना वेळ मिळत नसतो इथेही खेदाने व्यक्त करणे गरजेचं आहे. कार्यक्रम वेळी प्रतिष्ठानचे मुख्य कार्यकर्ते, साई वाघमोडे, श्रीरंग पाठमासे, गणेश जाधव, दिनेश बिरादार, सूरज लासूने, शिवम बावगे, अतिश सुर्यवंशी, रामेश्वर कोटलवार, पवन घोगरे, प्रशांत ममदापुरे, सौरभ चौहान, ओम सूक्ते, ओम काबरा, शंकर सूर्यवंशी, संगम पाटील, संध्याराणी वाघमोडे, कीर्ती बिरादार, प्रांजल सुवर्णकार, आकांक्षा सोनटक्के, श्वेता जाधव, मयुरी बाळासाहेब शिंदे व प्रतिष्ठान चे सदस्य यावेळी उपस्थित होते.
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठान उदगीरच्या या पहिला दिवा या देव माणसांसाठी ज्यांनी आपले जीवन प्रकाशमय केले हा नवीन दिवाळी उत्सवातील दिवा लावलेला दीप प्रज्वलन करून त्यांच्या विचारांचा पगडा त्यांच्या केलेल्या कार्याचा वापर सर्व समाजांपुढे दीप प्रज्वलन करून दीपोत्सवाचा आनंद साजरा करून एक दिवा महामानवाला लावून साजरा केला त्याच्या सर्वत्र कौतुक केले जात आहे.
0 Comments