Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उदगीर येथे कावळ्यांचा मृत्यू; उपाययोजनांसाठी शीघ्र कृती दल स्थापन

उदगीर येथे कावळ्यांचा मृत्यू; उपाययोजनांसाठी शीघ्र कृती दल स्थापन

• नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
• पशुपक्ष्यांचे अनपेक्षित मृत्यू आढळल्यास संपर्क साधावा

लातूर, दि. 15: उदगीर शहरात कावळ्यांच्या अनपेक्षित मृत्यूच्या घटनेची तातडीने दखल घेत मृत कावळ्यांचे वैद्यकीय नमुने औंध येथील राज्यस्तरीय पशुरोग निदान प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. याबाबतचा वैद्यकीय तपासणी अहवाल प्राप्त होताच पुढील आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे. या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर शीघ्र कृती दल स्थापन करण्यात आले आहे. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच जिल्ह्यात इतरत्र कोणत्याही पशुपक्ष्यांच्या अनपेक्षित मृत्यूच्या घटना आढळून आल्यास त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या प्रमुखाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी केले आहे.
उदगीर शहरातील महात्मा गांधी उद्यान व हुतात्मा स्मारक नगर परिषद वाचनालय परिसरात 13 जानेवारी रोजी 28 कावळे मृतावस्थेत आढळले. उदगीर तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय येथील सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. पांडे यांनी तात्काळ मृत कावळ्याचे वैद्यकीय नमुने राज्यस्तरीय पशुरोग निदान प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. 14 जानेवारी रोजी आणखी 8, तर 15 जानेवारी रोजी 5 कावळे मृतावस्थेत आढळले. यामुळे एकूण मृत कावळ्यांची संख्या 41 झाली आहे. या सर्व कावळ्यांची वैज्ञानिक पध्दतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे.
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे, लातूर विभागीय पशुरोग निदान प्रयोग शाळेचे पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. मनोज घाटे, पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. एस. आर. साळवे यांच्या पथकाने 15 जानेवारी रोजी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. तसेच उदगीर तालुक्यातील सर्व पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. रोग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी पीपीई किट्स, ग्लोव्हज, सॅनिटायझर यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. 
औंध येथील प्रयोगशाळेतून नमुना निदान अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच लातूर जिल्ह्यात इतरत्र पशुपक्ष्यांमध्ये कोणत्याही प्रकारची अनपेक्षित मृत्यूची घटना आढळल्यास नागरिकांनी त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना प्रमुखांशी सपंर्क साधावा. अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले आहे.
*****

Post a Comment

0 Comments

जाहिरात