नामविस्तार दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
उदगीर:डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ दि. १४ जानेवारी रोजी अभिवादन कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी उदगीर तालुक्यातील आंबेडकर प्रेमी नागरिक उपस्थित होते.
मराठवाडा विद्यापीठास डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यात यावे यासाठी अनेक पिठ्या रस्त्यावर उतरून आंदोलन केले. अनेकजण शहिद झाले. या थोर भीमसैनिकांना अभिवादन करण्यासाठी व नामविस्तार दिन साजरा करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाबासाहेब सूर्यवंशी, गटविकास अधिकारी प्रवीण सुरोडकर, विद्यासागर डोरनाळीकर, सतीश पाटील मानकीकर, पंकज कालनी, ज्ञानेश्वर बिरादार, अंकुश ताटमपल्ले, बालाजी गायकवाड, शिवनीवाले मामा, शक्ति बलांडे, यशवंत गायकवाड, सचिन गायकवाड, बाबासाहेब कांबळे, सुनील पोकळे, सोनू जाटव, सुभाष जाटव, राजेश जाटव, धर्मदास जाटव, हरीश जाटव, हरेश जाटव, मनीष जाटव व आदींची उपस्थिती होती.
0 Comments