Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्ज अपात्रतेबाबत महिला व बाल विकास विभागाची माहिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्ज अपात्रतेबाबत महिला व बाल विकास विभागाची माहिती

लातूर, दि. ३१ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे मोठ्या संख्येने अर्ज अचानक अपात्र केल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. याबाबत महिला व बाल विकास विभागाने दिलेल्या वस्तुस्थितीदर्शक माहितीनुसार, या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्या-त्या वेळी अटी व निकषांची काटेकोरपणे तपासणी करून अर्जांची छाननी करण्यात आली आहे. या कार्यवाहीमध्ये त्रुटी असलेले अर्ज त्या-त्या वेळी अपात्र ठरविण्यात आलेले आहेत. एकाच वेळी मोठ्या संख्येने अर्ज अपात्र करण्याची कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही, असे महिला व बाल विकास अधिकारी जावेद शेख यांनी कळविले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु झाल्यानंतर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले. ऑनलाईन प्राप्त होणाऱ्या अर्जांची त्या-त्या वेळी विविध टप्प्यांवर छाननी करण्यात आली. कागदपत्रातील त्रुटी व इतर कारणांमुळे या छाननीमध्ये काही महिलांचे अर्ज त्या-त्या अपात्र ठरले. ही कार्यवाही योजना सुरु झाल्यापासूनच सातत्याने सुरु होती. एकाच वेळी मोठ्या संख्येने अर्ज अपात्र करण्याची कोणतीही कार्यवाही महिला व बाल विकास विभागामार्फत करण्यात आलेली नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर महिलांचे मोठ्या संख्येने अर्ज अपात्र ठरविण्यात आल्याचा दावा जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाने फेटाळला आहे.
*****

Post a Comment

0 Comments

जाहिरात