विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत उदयगिरीचे सुवर्ण यश: शुभम मोतीपवळे यांना सुवर्णपदक
येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील शुभम विरभद्र मोतीपवळे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड च्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी – 2024 परीक्षेमध्ये विद्यापीठात बी.कॉम. तृतीय सर्वप्रथम आल्याबद्दल कै. धनाजीराव सदाशिवराव बिरादार पुरस्काराने प्रशस्तीपत्रक व सुवर्णपदक देऊन कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते 27 व्या दीक्षांत समारंभात सन्मानित करण्यात आले. तसेच स्नेहा गुणवंत हलकुडे वनस्पतीशास्त्र या विषयात बी.एस्सी. तृतीय वर्षात सर्वाधिक गुण घेऊन विद्यापीठात प्रथम आली आहे. त्याबद्दल तिला प्रा. डी. एस. मुकादम पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ. रेखा रमण रेड्डी, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव अॅड. एस. टी. पाटील, डॉ. रामप्रसाद लखोटिया, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, उपप्राचार्य डॉ. सुधाकर पाटील यांनी अभिनंदन केले. शुभम मोतीपवळे या गुणवंत विद्यार्थ्याला वाणिज्य विभाग प्रमुख बालाजी होकरणे, डॉ. संतोष घोंगडे, प्रा. गजानन पळनाटे, प्रा. कौशल म्हेत्रे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राहुल अलापुरे, डॉ. विनय नागपूर्णे यांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments