Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन

▪️लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षात मिळणार रूग्णांना मदत

लातूर, दि. ०१ : राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. प्रदीप ढेले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

राज्यातील गरजू रूग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यासंदर्भात २२ फेब्रुवारी २०२५ रोजी शासन निर्णय काढण्यात आला. शिवाय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाची २३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती, या बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष पुर्ण क्षमतेने कार्यान्वयित करणेबाबत निर्देश दिले होते.  

वैद्यकीय उपचासाठी मदत मिळावी याकरिता गरजू रूग्ण व त्यांचे नातेवाईक मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज करत असतात. अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी ते मंत्रालयात वारंवार येतात. रूग्ण व नातेवाईकांना होणारा त्रास लक्षात घेवून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दुरदृष्टीतून रूग्ण व नातेवाईकांची परवड थांबविण्याच्या उद्देशातून जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

*अशी आहे कक्षाची जबाबदारी*

- अर्ज करण्यासाठी रूग्ण व नातेवाईकांना मदत करणे.
- प्राप्त अर्जांची सद्यस्थिती उपलब्ध करुन देणे.
- रूग्ण व नातेवाईकांच्या समस्यांचे निराकरण करणे.
- आर्थिक मदत झालेल्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन भेट घेणे.
- नागरिकांमध्ये कक्षा बाबत जनजागृती आणि प्रसिध्दी करणे.
- कक्षामार्फत अर्थसहाय्य देण्याकरिता आजारांचे पुनर्विलोकन करणे.
- जिल्ह्यातील आपत्तीच्या ठिकाणी भेटी देणे.
- मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अधिकाधिक देणग्यांचा ओघ येण्याकरिता प्रयत्न करणे.
- अर्थसहाय्य देण्यात येणाऱ्या आजारांच्या संख्येत वाढ करण्यासाठी प्रयत्न करणे.

*रूग्ण व नातेवाईकांना होणार कक्षाचे फायदे*

- रूग्ण व नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाला अर्ज करण्याकरिता मदत मिळणार.
- अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी, माहिती सहज उपलब्ध होणार.
- संलग्न असणाऱया रूग्णालयांची यादी मिळणार.
- अर्ज किंवा पाठपुरावा करण्यासाठी मंत्रालयात जाण्याची गरज भासणार नाही.
- अर्जाची स्थिती जिल्हाधिकारी कार्यालयात समजणार

******

Post a Comment

0 Comments

जाहिरात