कत्तलीसाठी ८ बैलांना डांबून नेणाऱ्या टेम्पोला पोलिसांनी पकडले..
उदगीर : प्रतिनिधी
उदगीर - लातूर मार्गावर उदगीर जवळच गोवंश जातीच्या ८ बैलांची कतल करण्यासाठी वाहतूक करणाऱ्या टेम्पोला पोलिसांनी पकडून ३ मे रोजी सायंकाळी चारच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ३ मे रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास लातूर मार्गावर नळेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर उदगीर जवळ आरोपीने संगणमत करून विना परवाना स्वतःच्या अर्थिक फायदयासाठी आयशर टेंपो क्र. एम.एच.४३ ए डी ४३२६ या टेम्पो मध्ये
एकूण ८ बैल ज्याची अंदाजे ४ लाख रुपयांचे
जनावरे डांबून त्यांना इजा व यातना होईल अशा रितीने क्रूरतेची वागणूक देऊन बेकायदेशीररित्या त्यांची कत्तल करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना पोलिसांना मिळून आले आहेत. ४ लाखांची ८ बैल व आयशर टेम्पो ज्याची अंदाजे किंमत ५ लाख रुपये असा एकुण ९ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलीस कर्मचारी देविदास ज्ञानोबा किवंडे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.ऩं.२५२/२०२५ कलम ५(अ)(१),५(अ)२ सह कलम ११(१)(ड)(इ) प्राण्यास निर्दयीपणे वागविणे प्रतिबंध अधिनीयम १९६० व मोटार वाहन कायदा कलम ६६(१),१९२ नुसार सुनिल बाबुराव राठोड, चालक राहणार. रेणापूर, सोहेल मोहसीन अली सय्यद राहणार रेणापुर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल शिरसे हे करीत आहेत.
0 Comments