तलाठी अमोल रामशेट्टे आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्काराने सन्मानित
लातूर:सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी वर्षभर उत्कृष्ट ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्य करणाऱ्या एका ग्राम महसूल अधिकाऱ्याची निवड करण्यात येते त्यात उदगीर तालुक्यातील निडेबन तलाठी सज्जाचे ग्राम महसूल अधिकारी अमोल रामशेट्टे यांची निवड होऊन त्यांचा एक मे महाराष्ट्र दिनी पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
लातूर जिल्हा महसूल विभागातून या पुरस्कारासाठी फक्त एका तलाठ्याची निवड करण्यात येते या पुरस्कारासाठी अमोल रामशेटे यांची निवड करत असताना त्यांनी केलेल्या शासनाची ॲग्रीस्टॅक योजना १००% ई पिक पाहणी ची अंमलबजावणी निवडणूक काळात उत्कृष्ट कार्य व तसेच महाराष्ट्रातील पहिले व एकमेव आयएसओ नामांकन मिळविणारे तलाठी कार्यालय ठरले असून, मुख्यमंत्र्यांनी आखून दिलेल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत निडेबन तलाठी सज्जा कार्यालय हे लातूर जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात उत्कृष्ट कार्यालय म्हणून नावारुपाला आणून शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा असलेला पानंद रस्ता मुक्ती योजना असो की महसूल कर असो या सर्व कार्यामध्ये शंभर टक्के वसुली करून शासनाच्या तिजोरीमध्ये महसूल जमा करण्याचे काम आणि आपले कार्यालय संगणकीकृत ऑनलाइन प्रणालीशी जोडून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अडचणी जागेवर सोडवून शेतकऱ्याची जीवनमान उंचावण्याचे काम मागच्या चार वर्षात तलाठी अमोल राम शेट्टी यांनी केल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांचा उत्कृष्ट ग्राम महसूल अधिकारी म्हणून सन्मानित केल्याबद्दल त्यांचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर यांच्यासह उदगीर तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी रामशेटे यांचे कौतुक केले आहे.
पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देणार
उत्कृष्ट ग्राम महसूल अधिकारी पुरस्कारासोबत मिळालेली संपुर्ण रक्कम आपण मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दान देणार असल्याचे तलाठी अमोल रामशेट्टे यांनी सांगितले..
0 Comments