ऑटोला कट का मारला म्हणून बस चालकास मारहाण,ऑटो चालकांवर गुन्हा दाखल
उदगीर शहरात ऑटो चालकाने एसटी बस चालकास माझ्या ऑटोला कट का मारलास म्हणून उदगीर बस्थानकात मारहाण केल्या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात ऑटो चालकांवर ४ मे रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की ४ मे रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास आरोपीने एसटी बस चालक उदगीर बस्थानकात कर्तव्यावर असताना माझ्या ऑटोला कट मारून का आलास म्हणून फिर्यादीच्या शर्टाला धरून एसटी बसच्या खाली ओढले व लाथाबुक्क्याने तोंडावर,व चापटाने छातीवर मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला,याप्रकरणी एसटी बस चालक बाळासाहेब किशनराव फड यांच्या फिर्यादीवरून आरोपी आकाश गंगाधर कांबळे राहणार कासराळ ता उदगीर यांच्यावर उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गायकवाड हे करीत आहेत.
0 Comments