Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधनारी रामकृष्ण पब्लिक स्कूल

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधनारी रामकृष्ण पब्लिक स्कूल 

उदगीर:- सध्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांची सख्या वरचेवर वाढत असताना दिसून येते त्याचे कारणही तसेच आहे. शिस्त, संस्कार आणि विविध उपक्रमाच्या माध्यमातून या शाळांमध्ये गुणवतापूर्ण शिक्षण दिले जाते. असं पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालक सामान्यताला सामान्य आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठवत आहे. अशीच एक विद्यार्थ्यांना गुणवतापूर्ण शिक्षण देणारी रामकृष्ण पब्लिक स्कूल! श्रीनगर कॉलनी, बिदर रोडवरील रामकृष्ण पब्लिक स्कूल ही शाळा संस्कार आणि गुणवतेच्या बाबतीत आघाडीवर असलेली उदगीर शहरातील नामांकित शाळा म्हणून गणल्या जाते. या शाळेचे अध्यक्ष श्री. अरविंद पत्की यांनी अतिशय मेहनतीतून उभारलेली ही शाळा आहे. 2009 मध्ये या शाळेची सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात या शाळेत 34 विद्यार्थी होते आज या शाळेत 150 ते 200 विद्यार्थी शिक्षण घेतात. तर 8 ते 10 कर्मचारी इथे ज्ञानदानाचे काम करतात. पालकांना परवडेल अशा सवलतीच्या दरात फीस आकारली जाते. शाळेच्या प्राचार्या सौ. हुंडेकर मॅडम यांचा प्रयत्नांने या शाळेची यशस्वी वाटचाल चालू आहे. तसेच एनकी मानकी रोडवर रामकृष्ण पब्लिक स्कूलची दुसरी शाखा सुरु झाली असून या ठिकाणी नर्सरी ते युकेजी चे शिक्षण दिले जाते. इथे तीन शिक्षक कार्यरत आहेत. या शाळेमध्ये शिस्त, संस्कार आणि गुणवतेचे धडे दिले जातात. लहान वयापासूनच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत घडावा, इंग्रजी विषयाची भीती दूर व्हावी या दृष्टीने प्रयत्न करून विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त स्पर्धा परीक्षेतही परिपूर्ण केले जाते. शाळेत वेगवेगळ्या विषयांचे वर्ग घेतले जातात. त्यामाध्यमातून विद्यार्थी घडला जातो वेगवेगळ्या वर्गासाठी  विविध स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी बसविले जातात आणि मार्गदर्शन केले जाते. या शाळेतील विद्यार्थी विविध परीक्षेत जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवर यश मिळवितात.शिष्यवृत्ती, एम. टी. एस., बी. टी. एस., आय. एम. ओ., एन. एस. ओ., श्रेया, अशा अनेक परीक्षेत या शाळेचे विद्यार्थी यश संपादन करून शिष्यवृत्तीस पात्र ठरले. हस्ताक्षर, रंगभरण स्पर्धेतही काही विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.या शाळेत विद्यार्थ्याकडून वेगवेगळ्या वस्तू बनवून घेतल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणाना वाव मिळतो. सार्वजनिक शिवजयंती महोत्सवानिमित्त  मिरवणूकीमध्ये उत्कृष्ट देखावे सादर केल्यामुळे समितीच्या वतीने या शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देवून गौरवण्यात आले. शाळेतीन दरवर्षी शैक्षणिक सहल काढली जाते. या शाळेत बालकांसाठी ग्रंथालय असून त्यात बाल साहित्याची 500 पेक्षा जास्त पुस्तके आहेत. क्रीडा साहित्य व इतर भौतिक सुविधा येथे उपलब्ध आहेत. या शाळेत महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी चे आयोजन केले जाते. व मान्यवरांकडून त्या त्या महापुरुषांच्या जीवनात चरित्रावर माहिती दिली जाते.विद्यार्थ्यांना दिनविशेष व सणा वाराची  माहिती व्हावी म्हणून गोकुळाष्टमी, मकरंसंक्रात, गुडी पाडवा, दसरा, दिवाळी, रमजान ईद, धुलिवंदन, गुरुपौर्णिमा, शिक्षक दिन,, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 17 सप्टेंबर, 1 मे, वार्षिक स्नेहसंमेलन, गायन  नृत्य, वक्तृत्व, यासारखी कार्यक्रम घेवून विद्यार्थ्यांच्या सर्व गुणांना वाव देवून परिपूर्ण माहिती दिली जाते.या शाळेच्या प्राचार्या सौ. हुंडेकर मॅडम हया उच्च शिक्षित असून त्यांनी 10 वर्षे संगमेश्वर कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडविले. या शाळेच्या प्राचार्या म्हणून रुजू झाल्यावर सौ. हुंडेकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला. त्यांच्या कार्यामुळे इंडियन टॅलेंट मुंबईचा गोल्डन स्कूल म्हणून शाळेला पुरस्कार मिळाला. या शाळेचे संचालक अरविंद पत्की यांनी गोरगरिबांची मुले इंग्रजी शिक्षणात मागे राहूनये या उद्देशाने या शाळेची सुरुवात केली. त्यांना शिक्षणाबरोबरच त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. पाणी टंचाईच्या काळात त्यांनी पाणी फाउंडेशनच्या वतीने उल्लेखनीय कार्य आहे. वृक्षारोपनाची त्यांना आवड आहे. आतापर्यंत त्यांनी शेकडो वृक्षाचे शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाणी लागवड केली व ती जिवंत ठेवण्याचे काम केले. त्यांच्या कार्याची नोंद घेवून त्यांनाही अनेक सन्मान प्राप्त झाले. एकूणच रामकृष्ण पब्लिक स्कूलची वाटचाल यशस्वीरित्या चालू असून शाळेच्या प्राचार्या सौ. हुंडेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षिका शेख शबनम, कंचे सुनीता, अंजली बोन्द्रे, शेख हिरा, शर्मिष्ठा पवार, आश्विनी बालुरे, शिल्पा चव्हाण, कुलकर्णी नागराणी हे विद्यादानाचे कार्य करतात. रामकृष्ण पब्लिक स्कूलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊया!

Post a Comment

0 Comments

जाहिरात