Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार प्रकरणात आरोपीला

अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार प्रकरणात आरोपीला

२० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

उदगीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

उदगीर : प्रतिनिधी
वाढवणा पोलीस ठाणे अंतर्गत दि.८ डिसेंबर २०२१  रोजी एका पिडीत तरूणीवर आरोपी बालाजी सोनकांबळे याने लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार केला. त्या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती आर.एम. कदम यांनी आरोपीला २० वर्ष सश्रम कारावसास तसेच रु. २०,०००/- दंडाची शिक्षा ठोठावली.
सदरची घटना मुलीने तिच्या आजीस सांगितली. आजीने दिलेल्या तक्रारीवरुन वाढवणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक एस.पी. जोंधळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांच्याकडे वर्ग केला. त्यांनी तपासाअंती माननिय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणाची सुनावणी ही उदगीर जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये चालली ज्यात सरकार पक्षाच्या वतीने एकूण १२ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. सरकारी वकील यांनी केलेला युक्तीवाद, साक्षीदारांनी दिलेली साक्ष व न्यायवैद्य अहवाल विचारात घेवून उदगीर येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती आर. एम. कदम यांनी आरोपीला बाल लैंगीक अत्याचार कायदा कलम ४ अन्वये २० वर्षे सश्रम कारावास तसेच रु. ५,०००/- दंड व दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास तसेच कलम ६ अंतर्गत २० वर्षे सश्रम कारावास तसेच रु. ५,०००/- दंड व दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास तसेच कलम ८ अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास व रु. ५,०००/- दंड व दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास तसेच कलम १२ अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास व रु. ५,०००/- दंड व दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. सदरची शिक्षा ही आरोपीने एकत्रीत भोगावयाची असून दंडाची रक्कम पिडीतेला देण्याचे आदेश माननिय न्यायालयाने दिले आहे.
सदर प्रकरणात सरकारी वकील म्हणून अॅड. शिवकुमार गिरवलकर यांनी काम पाहिले व त्यांना कोर्ट पैरविकार राज महम्मद शेख यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments

जाहिरात