विवाहितेचा सासरच्या मंडळीकडून ११ महिने छळ व दिराकडून विनयभंग;
उदगीर : प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील मुलांच्या नातेवाईकांनी मुलगा हा कर्करोगाने ग्रस्त असताना तरी देखील मुलाचे आजारपण लपवून उदगीर येथील मुलीचा फसवणूकीने विवाह करुन विवाहितेस ३ लाख रुपयांची बुलेट घेण्यासाठी व २० लाख रुपयांचा प्लाॅट घेण्यासाठी माहेरहून सदरची रक्कम घेऊन ये म्हणून सासरच्या मंडळीकडून अकरा महिने मानसिक व शारीरिक छळ करुन दिराकडून विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी गुरुवारी (२२ मे) दुपारी दिडच्या सुमारास सासरच्या १० जणांविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ९ एप्रिल २०२४ ते २२ मार्च २०२५ पर्यंत उदगीर येथील विवाहितेचा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे सासरच्या मंडळींनी आपसात संगनमत तुषार कुंडलिक बहीर (पती), कुंडलिक विठठल बहीर (सासरे), चंद्रकला कुंडलिक बहीर (सासू), शुभम कुंडलिक बहीर (दीर), यांनी विवाहितेस माहेरहून नवीन बुलेट घेण्यासाठी ३ लाख रूपये व प्लॉट घेण्यासाठी २० लाख रूपये घेवून ये म्हणून वारंवार शिवीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण करून शारीरीक व मानसीक त्रास देवून विवाहितेच्या अंगावर घातलेले १३ तोळ्याचे सोन्याचे दागीने काढून घेतले व शुभम कुंडलिक बहीर (दीर), याने वाइट हेतुने फीर्यादीचे हातास धरून ओढून फीर्यादीचे मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले तसेच सर्व १० आरोपींनी संगनमत करून विवाहितेचा पती नामे तुषार कुंडलिक बहीर यास कीडनीचा व कॅन्सरचा आजार असल्याचे माहीत असतानासुध्दा जाणीवपुर्वक लपवून विवाह करुन विवाहितेची फसवणुक केली आहे. असे जबाब विवाहितेने दिल्यावरुन उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं.३०७/२०२५ कलम ८४, ३१८, १३६,(२), ७४, ७५, ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) भारतीय न्याय सहिंता २०२३ नुसार तुषार कुंडलिक बहौर (पती), कुंडलिक विठठल बहीर (सासरे), चंद्रकला कुंडलिक बहीर (सासू), शुभम कुंडलिक बहीर (दीर), अमोल अर्जुन बहीर (चुलत दीर), सुनिल बाबासाहेब उगले (मामा), अकुंश विष्णु उगले (चुलत मामा) (सर्व रा.जामखेड), प्रफुल्ल पंढरीनाथ बहीर (चुलत दीर) रा. नाहुली ता जामखेड जि अहील्यानगर, बाबासाहेब रामभाऊ उगले (आजोबा), अशोक लेंडे पाटील (दोघे रा. नायगाव ता जामखेड जि अहील्यानगर) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रायपल्ले हे करीत आहेत.
0 Comments