Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

देशमुख यांचा भीषण अपघातात मृत्यू,अपघाताचे कारण अस्पष्ट, तपास सुरू

देशमुख यांचा भीषण अपघातात मृत्यू,अपघाताचे कारण अस्पष्ट, तपास सुरू

लातूर प्रतिनिधी
माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आणि जनमानसात 'जीजा' या नावाने लोकप्रिय असलेले आदरणीय आर. टी. जीजा देशमुख (वय अंदाजे ७०) यांचे बेलकुंड, ता. औसा, जि. लातूर जवळ भीषण अपघातात निधन झाले आहे. या हृदयद्रावक घटनेने बीड आणि लातूर जिल्ह्यासह संपूर्ण माजलगाव मतदारसंघात शोककळा पसरली असून, राजकीय वर्तुळातून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे
.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, देशमुख हे आपल्या गाडीने (गाडी क्रमांक एमएच ४४ एडी २७९७) प्रवास करत असताना बेलकुंड गावाजवळ औसा रोडवर त्यांच्या गाडीला आज दिनांक 26 मे रोजी दुपारी भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की, गाडीचे मोठे नुकसान झाले असून, देशमुख यांना वाचवण्याची संधीच मिळाली नाही. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.*
*अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. समोरून येणाऱ्या वाहनाशी धडक झाली की, गाडीवरील नियंत्रण सुटले, याबाबत तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.* *पंचनामा करून देशमुख यांचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात हलवण्यात आला आहे.*
*आर. टी. जीजा देशमुख हे माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार होते. त्यांनी आपल्या आमदारकीच्या काळात मतदारसंघाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले होते. सर्वसामान्यांशी त्यांचे थेट आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. जनतेच्या सुख-दुःखात ते नेहमीच सहभागी होत असत, त्यामुळे 'जीजा' या नावाने ते जनमानसात प्रिय होते. त्यांच्या निधनाने माजलगावची मोठी हानी झाली असून, एक तळमळीचा आणि जनतेच्या हितासाठी झटणारा नेता हरपल्याची भावना* *सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे.*
*त्यांच्या निधनाची बातमी पसरताच अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते आणि हजारो समर्थकांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. देशमुख यांच्या आकस्मिक निधनाने जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे*.

Post a Comment

0 Comments

जाहिरात