पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त नागलगाव येथे महिलांचा सन्मान
उदगीर:नागलगाव ग्रामपंचायत कार्यालयात येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्याच बरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त नागलगावातील सौ.सपना राम कांबळे व सौ.शारदा सूर्यकांत जवळगे या महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी नागलगावचे प्रथम नागरिक सरपंच सुभाष मुन्ना राठोड,उपसरपंच नेताजी कांबळे,नागलगावचे ग्रामविकास अधिकारी भोसले,ग्रामपंचायतिचे लिपिक रमेश बिरादार, ग्रामपंचायतिचे सदस्य बस्वराज गुडसुरे,गणपत पाटील,पांडुरंग कांबळे,भानुदास कांबळे,शिवा जाधव,बाळू शेरे,ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.
0 Comments