साखरापुड्याचा कार्यक्रम पार पडत असताना,वधू वरांचे लावले अचानक लग्न
मुलींकडे साखरापुडा न करता, मुलांच्या घरी साखरपुड्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता,
उदगीर तालुक्यातील बोरतळा तांडा येथे साखरपुड्याचा कार्यक्रम थाटात सुरू असताना अचानक वधू वारांचा विवाह लावण्यात आला,बोरतळा तांडा नागलगाव ता उदगीर जि लातूर येथील सुधीर रामधन राठोड यांचा मुलगा ओमकार राठोड, मंगीलाल बाबू जाधव राहणार बऱ्हाळी ता मुखेड जि नांदेड यांची मुलगी नैना जाधव या दोघांच्या साखरापुड्याचा कार्यक्रम बोरतळा तांडा येथे मुलांच्या घरी 29 मे रोजी रात्री सुरू होता,कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका पाहुण्यांना देण्यात आल्या होत्या,साखर पुड्याच्या कार्यक्रमास पाहुणे मंडळी मोठया प्रमाणात उपस्थित होते.आलेल्या काही पाहुण्यांनी मुलांच्या आई वडीलाना व मुलींच्या आई वडीलाना साखरपुड्या ऐवजी लग्न लावण्याचा आग्रह धरला,जवळपास दोन तास या सोहळ्या विषयी चर्चा करण्यात आली चर्चे अंती पाहुण्यांचा आग्रहाला वधू वरांच्या आई वडीलानी होकार देताच साखरपुड्याचा ठरलेला कार्यक्रम रद्द करून लग्न विवाहाची तयारी केली वधू वराना लगेच हळद लावण्यात आली,साखरपुड्याच्या कार्यक्रमाच्या विधीसाठी आलेल्या ब्राम्हणांना मात्र लग्न सोहळ्याची विधी करावी लागली, आलेल्या पाहुण्यांच्या मनात असे होईल म्हणून वाटले नव्हते.मुलीकडील वीस ते पंचवीस लोक या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला आले होते.साखरपुड्याचा कार्यक्रम करून लग्नाची तारीख काढण्यात येणार होती.परंतु अचानकपणे 29 मे रोजी साखरपुड्या ऐवजी रात्री 11 वाजता विवाह सोहळ्याचा कार्यक्रमच उरकून टाकला,मुलांच्या व मुलींच्या आईवडिलांनी घेतलेल्या निर्णयाचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मराठवाडा कार्याध्यक्ष चंदन पाटील नागराळकर,माजी सभापती प्रा शिवाजी मुळे, माजी कृषी सभापती बापूराव राठोड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानेश्वर पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पद्यमाकर उगीले,उदयसिंह ठाकूर,सेवा निवृत्त तहसीलदार धनाजी राठोड,सागर बिरादार,विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन कलपा पाटील,संग्राम मोरखंडे, गुणवंत पाटील,श्रीधर राठोड,जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सीमा पवार,विजय हरीलाल पवार,सचिन जाधव,अनिल गुरुजी,सुभाष विरभान पवार,ब्रह्मदेव पवार,नीलकंठ पवार,बिपिन पवार, पंकज राठोड,संजय नाईक,वामन राठोड(बंगाली) फुलसिंग पवार, लक्ष्मण पूना राठोड,नायक शंकर थावरा राठोड, दिगंबर रामचंद्र राठोड, रमेश रामचंद्र राठोड,या राजकीय मंडळीनी सुधीर रामधन राठोड यांचे कौतुक केले.
0 Comments