उदित संजय बोरगावे यांची पोलीस दलात नियुक्ती,शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी केला सत्कार
उदगीर:तालुक्यातील शेकापुर येथील एका कामगाराचा मुलगा उदित संजय बोरगावे याची मुंबई पोलीस दलात नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा 17 मे रोजी उदगीर शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या हस्ते शाल व पुष्पहार श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी पो उप निरीक्षक. अभिजित कुदळे,पोलीस नाईक विनायक चव्हाण व शहर पोलीस कर्मचारी उपस्थित होते उदित संजय बोरगावे यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या
0 Comments