बोरतळा तांडा येथे शॉर्ट सर्किटमुळे घराला लागली आग,ग्रहउपयोगी साहित्याचे नुकसान
उदगीर तालुक्यातील बोरतळा तांडा येथे एकाच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना 22 मे रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली,सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की बोरतळा तांडा येथील सुनील अंबादास राठोड यांच्या घराला आतमधून अचानकपणे आग लागली घरातून धुरांचे लोळ बाहेर पडल्यानंतर तांड्यातील लोकांनी पाहिले आग विझविण्यासाठी युवकांनी प्रयत्न केला परंतु तो पर्यंत घरातील ग्रहउपयोगी साहित्य जळून खाक झाले होते घरात ठेवलेली साहित्य जळाल्याने सुनील अंबादास राठोड यांचे मोठे नुकसान झाले आहे ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे सूत्रांनी सांगितले
0 Comments